Nashik News : निफाड नगरपंचायतीतर्फे पाणीपट्टीत वाढ; अतिरिक्त भारामुळे निर्णय

Officials and Chief Officer while giving information in the press conference held on Monday in Nagar Panchayat.
Officials and Chief Officer while giving information in the press conference held on Monday in Nagar Panchayat. esakal

Nashik News : नगरपंचायत स्थापनेपासून पाणीपुरवठा तोट्यात आहे. पाणीनिर्मितीचा २०२२-२३ चा खर्च एक कोटी आठ लक्ष रुपये आहे. नगरपंचायतीची पाणीपट्टी मागणी ४८ लक्ष ७३ हजार आहे.

घरगुती नळकनेक्शनसाठी २४०० व व्यवसायिक कनेक्शनसाठी पाच हजार पाणीपट्टी आकारली होती. मात्र, लोकभावनेचा आदर करून सर्वसाधारण सभेने पाणीपट्टीचा दर २४०० वरून दोन हजार केले आहेत. (Niphad Nagar Panchayat increases water supply nashik news)

एकूण ४,२३० नळकनेक्शन असून, २०२३-२४ ची पाणीपट्टी मागणी ८६५०००० रुपये आहे. या दरवाढीमुळे नगरपंचायतीच्या उत्पन्नात ३५ ते ३६ लक्ष वाढ होत आहे. मात्र, खर्च अंदाजे एक कोटी १० लक्ष रुपये अपेक्षित आहे. त्यामुळे पाणीपट्टीत वाढ करूनही २३,५०,००० रुपयांचा अतिरिक्त भार नगरपंचायतीवर पडणार आहे.

पाणीयोजना प्रस्तावित आहे. या योजनेसाठी नगरपंचायतीला १० टक्के स्वहिस्सा भरायचा आहे. त्यामुळे नगरपंचायतीचे पाणीपट्टीचे उत्पन्न त्याप्रमाणात असणे आवश्यक आहे. यासाठी निधीची आवश्यक्ता असल्याने पाणीपट्टीत वाढ करणे अनिवार्य आहे.

नगरपंचायतीमार्फत आकारण्यात येणारे वृक्ष कर, रोजगार हमी, शिक्षण, अग्निशमन कर, तसेच घनकचरा व्यवस्थापन युजर चार्जेस शासन निर्णयानुसारच घेण्यात येतात. नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालकांच्या निर्देशांनुसार नगरपरिषदा/नगरपंचायतींना सक्षम करण्यासाठी विविध कर/दरामध्ये सुधारणा करणे व विविध दाखले फी यात वाढ करणे अनिवार्य आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Officials and Chief Officer while giving information in the press conference held on Monday in Nagar Panchayat.
Nashik Dada Bhuse : ‘क्वालिटी सिटी’ चळवळीत सहभागी व्हा : पालकमंत्री भुसे

शासनामार्फत १५ वित्त आयोग, स्वच्छ भारत अभियान, जिल्हा नियोजन समिती निधी अधिक प्रमाणात प्राप्त होण्यासाठी नगरपंचायतीला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आणि स्वनिधीमध्ये वाढ करणे बंधनकारक आहे.

त्यामुळे सर्व निफाडकरांनी दरवाढीस समर्थन देवून नगरपंचायतीस सहकार्य करावे आणि सर्वांनी लवकरात लवकर मालमत्ता कर व पाणीपट्टी भरावी, असे आवाहन नगराध्यक्षा रत्नमाला कापसे, उपनगराध्यक्ष अनिल पाटील-कुंदे, मुख्याधिकारी अमोल चौधरी, स्वच्छता व आरोग्य सभापती साहेबराव बर्डे, पाणीपुरवठा सभापती संदीप जेऊघाले, बांधकाम सभापती किशोर ढेपले, सभापती अरुंधती पवार, नगरसेविका कविता धारराव, विमल जाधव, शारदा कापसे यांनी केले आहे.

Officials and Chief Officer while giving information in the press conference held on Monday in Nagar Panchayat.
Nashik Kumbhmela : एक्झिबिशन, लग्नसमारंभासाठी शेतकऱ्यांना जागा; साधुग्रामच्या जागेसाठी नवीन प्रस्तावाची तयारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com