NMCच्या मालकीचे भूखंड असुरक्षित

NMC News
NMC Newsesakal
Updated on

नाशिक : गंगापूर रोडवरील आनंदवली शिवारातील सर्व्हे क्रमांक ६७ या महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर खासगी बांधकाम झाल्याची बाब उघड झाल्याने महापालिकेचे भूखंड सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे तातडीने सर्वेक्षण करून महापालिकेचे भूखंड आरक्षित जागा व इमारतींचे विभागनिहाय सर्वेक्षण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नगररचना विभागाला दिल्या आहेत. पंधरा दिवसात सर्वेक्षण पूर्ण करावे अन्यथा संबंधितांना जबाबदार धरून कारवाई करण्याच्या इशारा त्यांनी दिला. (NMC commissioner orders to survey Plots owned by NMC Nashik Latest Marathi News)

आनंदवली शिवारातील सर्व्हे क्रमांक ६७ हा महापालिकेच्या मालकीचा १८ गुंठे क्षेत्राचा भूखंड आहे. सातबारा उताऱ्यावरदेखील महापालिकेचे नाव आहे. महापालिकेच्या भूखंडाला लागून सर्व्हे क्रमांक ६१ ब आहे. तीस मीटर रुंदीच्या रस्त्यावर असलेला भूखंड रोड वाइंडिंगमध्ये गेला आहे, मात्र असे असताना सर्व्हे क्रमांक ६१ व वर इमारत उभी करण्यात आली.

त्यामुळे महापालिकेचे भूखंड असुरक्षित असल्याची बाब अधोरेखित झाली आहे. यापूर्वीदेखील गोविंदनगर भागात महापालिकेच्या भूखंडावर खासगी अतिक्रमणे झाल्याची बाब समोर आली. पंचवटी अमरधाम येथील महापालिकेच्या मालकीच्या जागेवरदेखील अतिक्रमण झाले आहे. महापालिकेचे मोकळे भूखंड मोक्याच्या जागेवर असल्याने त्यावर अनेक भूमाफियांचा डोळा आहे.

NMC News
Nashik : ‘वात्सल्य वृद्धाश्रमा’च्या नावाखाली परप्रांतीयांकडून देणगीचे संकलन

त्यामुळे महापालिकेचे भूखंड सुरक्षित करण्यासाठी आयुक्तांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या मालकीच्या भूखंडाचे विभागनिहाय सर्वेक्षण करून पंधरा दिवसात त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. ज्या भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे, ते तातडीने हटवावे. त्याच्यानंतर अतिक्रमण होत असल्यास विभागीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. महापालिकेच्या मालिकेच्या भूखंडासह इमारती आदी भागांची पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

गुंठेवारी प्लॉटवर अतिक्रमण

शहरात मोठ्या प्रमाणात गुंठेवारीच्या प्लॉटवर अतिक्रमण आहे. विनयनगर येथील सर्व्हे क्रमांक ८६६/१/१ येथे स्थानिक नागरिकांनी तक्रार करूनदेखील अतिक्रमण विभागाकडून अतिक्रमण हटविले जात नाही. नगररचना विभागाने संबंधित बिल्डर्सला नोटीस देखील पाठविल्या आहेत.

असे असतानादेखील अतिक्रमण विभागाकडून कारवाई होत नाही. अशीच परिस्थिती शहरातल्या सर्वच गुंठेवारीच्या प्लॉटवर आहे. सातपूर विभागात सर्वाधिक गुंठेवारीच्या प्लॉटवर अतिक्रमण झाल्याचे तक्रारी असूनही कारवाई होत नाही.

NMC News
नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा : गिरीश महाजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com