NMC Election : ‘चक्राकार’मध्ये अनेकांच्या दांड्या गुल होणार

NMC Election Latest Marathi News
NMC Election Latest Marathi Newsesakal

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यांचा प्रभागरचना रद्द करून चार सदस्यांचा प्रभागांवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता आरक्षणाची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभानिहाय मतदारयादी अंतिम करताना वाढीव लोकसंख्येनुसार आरक्षण काढले जाणार आहे.

आरक्षण काढताना चक्राकार पद्धती अवलंबली जाणार आहे. यापूर्वी ज्या प्रभागांमध्ये महिलांसाठी आरक्षण निघाले नाही त्या जागांवर आरक्षण निघेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. (NMC Election Many people will lose their chance in 4 member ward nashik Latest marathi news)

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तीन सदस्यांची प्रभागरचना जाहीर करण्यात आली होती. त्यात दोन ते अडीच टक्के वाढीव लोकसंख्या गृहीत धरून नगरसेवकांची संख्या १३३ निश्चित करण्यात आली.

१३३ नगरसेवकांची संख्या झाल्याने तीन सदस्यांचे ४४ प्रभाग अस्तित्वात आले. आता शिंदे सरकारने निर्णय बदलताना २०१७ चीच प्रभागरचना कायम ठेवली आहे. १२२ नगरसेवक असताना ३१ प्रभाग अस्तित्वात होते.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी २०१७ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरावी लागणार असल्याने आरक्षण सोडत व मतदारयादी नव्याने तयार कराव्या लागणार आहे. आरक्षण व मतदारयादी तयार करण्याबरोबर त्यावर हरकती व सूचना मागण्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागेल. दरम्यान, प्रभागरचना कायम ठेवण्यात आली असली तरी आरक्षणे मात्र बदलणार आहे.

NMC Election Latest Marathi News
MSRTC कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 100 कोटी मंजूर

नियमानुसार रोटेशन पद्धतीनुसार आरक्षण बदलावे लागते. पूर्वी ज्या प्रभागांमध्ये आरक्षण होते व ज्या प्रभागांमध्ये आरक्षण नसेल, अशा प्रभागाच्या आरक्षणांमध्ये बदल होतील. मात्र, हे बदल करताना चक्राकार पद्धतीने बदल केले जाणार आहेत. महापालिका क्षेत्रात ३१ प्रभाग असल्याने फारसा बदल होणार नाही.

इतर मागासवर्गीय महिला गटातील आरक्षण बदलेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वी ज्या प्रभागांमध्ये आरक्षण नव्हते, तेथे आरक्षण पडेल. चार सदस्यांचा प्रभाग असल्याने ‘अ‘ ‘ब’ ‘क’ व ‘ड’ असे चार गट असतील.

यातील ‘क’ व ‘ड’ गटात सर्वसाधारण जागा असतील. ‘ब’ गटात महिला आरक्षण पडण्याची दाट शक्यता आहे. गटात अनुसूचित जाती व जमातीसाठी आरक्षण असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली

आरक्षण व प्रभागांची स्थिती अशी

* एकूण सदस्य संख्या- १२२
*चार सदस्यांच्या प्रभागांची संख्या- २९
*तीन सदस्यांच्या प्रभागांची संख्या- २
*एकूण प्रभाग- ३१
*अनुसूचित जाती राखीव- १८
*अनुसूचित जमाती राखीव-९
*इतर मागासवर्गीय राखीव- ३३
*महिलांसाठी राखीव जागा- ६१

NMC Election Latest Marathi News
हर घर तिरंगा : शासकीय कार्यालयावर यंदा 75 फुटाचा तिरंगा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com