NMC Fraud News : ‘त्या’ दीडशे महिलांना मिळाला न्याय; बडगुजर यांचे मानले आभार

Sudhakar Badgujar and dignitaries with happy women after receiving the cheque.
Sudhakar Badgujar and dignitaries with happy women after receiving the cheque. esakal
Updated on

Nashik News : इंद्रजित इन्स्टिट्यूट व गंगुस फाउंडेशन यांनी मनपाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली १५० महिलांकडून प्रत्येकी ६ व ११ हजार रुपयांप्रमाणे रक्कम उकळल्याचे वृत्त ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर वरील दोन्ही संस्थांच्या संचालकांचे धाबे दणाणले आणि त्यांनी या सर्व महिलांना त्यांच्याकडून घेतलेल्या रकमेचे धनादेश अदा केल्याने या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात पुढाकार घेऊन न्याय मिळवून दिल्याबद्दल या महिलांनी शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांना धन्यवाद दिले ()

महापालिका महिला बाल कल्याण विभाग व इंद्रजित इन्स्टिट्यूट माध्यमातून महिलांना विविध अभ्यासक्रमाद्वारे प्रशिक्षण देण्याचा व रोजगार निर्मितीचा हा उपक्रम आहे, असे सांगण्यात आले. त्यानुसार या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला.

प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण होण्याच्या अगोदर या इन्स्टिट्यूटची सिस्टर एजन्सी असलेल्या गंगुज फाउंडेशनच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी महिलांना रोजगार मिळवून देतो व व्यवसाय करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व खादी ग्राम उद्योग माध्यमातून प्रत्येकी पाच ते दहा लाख रुपये कर्ज मंजूर करून देण्यासाठी प्रत्येक महिलेकडून प्रत्येकी ६ व ११ हजार इतकी रक्कम वसूल केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sudhakar Badgujar and dignitaries with happy women after receiving the cheque.
Jal Jeevan Mission : नांदगाव तालुक्यातील गावांचा जलजीवन मिशन आराखड्यात समावेश

त्यात १५० महिलांची फसवणूक झाल्याचे निवेदन बडगुजर यांना देण्यात आले होते. या महिला महापालिकेवर मोर्चा काढण्याच्या मनःस्थितीत आल्या होत्या. परंतु इंद्रजित इन्स्टिट्यूटचे चालक कैलास सोनवणे आणि ईश्वरमूर्ती बोडके यांना बोलावून हा फसवणुकीचाच प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर कैलास सोनवणे यांनी स्वतः हमी घेऊन सदर महिलांना गंगुस फाउंडेशनच्या चालकाकडून महिलांकडून घेतलेल्या रकमेचे धनादेश त्यांना दिले.

सदर रक्कम लवकरच खात्यात जमा करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. सदर रक्कम खात्यात जमा न झाल्यास त्याला सर्वस्वी मी जबाबदार राहील, अशी हमी सोनवणे यांनी घेतली आहे. दरम्यान न्याय मिळवून दिल्याबद्दल या १५० महिलांनी बडगुजर यांचे आभार मानले आहेत.

भविष्यात अशी फसवणूक होऊ नये यासाठी प्रत्येक महिलेने सावध राहावे. आणि अशा प्रकारच्या काही घटना घडल्या असतील तर महिलांनी महापालिका किंवा महिला बालकल्याण विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन सुधाकर बडगुजर यांनी केले आहे.

Sudhakar Badgujar and dignitaries with happy women after receiving the cheque.
Nashik News : स्वस्त धान्य दुकानाचे जाहीरनामे; अर्ज करण्याचे पुरवठा विभागाचे आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com