NMC Promotion Scam case: बदली नंतरही घोडे-पाटील यांची स्वाक्षरी! निर्णयांची जबाबदारी झटकण्याचा प्रकार

NMC Ghode Patil
NMC Ghode Patilesakal
Updated on

NMC Promotion Scam case : महापालिकेचे माजी प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील यांची बदली झाली असली तरी महापालिकेत अद्यापही त्यांच्याच नावाने स्वाक्षरीचे पत्र निघत असल्याने खळबळ उडाली आहे.

एकूणच या गोंधळामागे घोडे-पाटील यांच्या कार्यकाळात झालेल्या निर्णयांची जबाबदारी झटकण्याचा हा प्रकार मानला जात आहे. (NMC Promotion Scam case Ghode Patil sign used after transfer form of abdication of responsibility for decisions nashik)

नाशिक महापालिकेचे माजी प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील यांच्या कार्यकाळामध्ये मोठा पदोन्नती घोटाळा झाला. पदोन्नत्या देताना जम्पिंग पदोन्नती तसेच चुकीच्या पद्धतीने, पात्र नसतानाही अधिकारी पदावर नियुक्ती करणे असे प्रकार घडले.

त्याकरिता मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचे बोलले जाते. पदोन्नती घोटाळ्यासंदर्भात ‘सकाळ’ मध्ये मालिका प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या व्यथा व्यक्त केल्या.

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते व महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी धाव घेत घोडे- पाटील यांच्या कार्यकाळात झालेल्या पदोन्नतीची चौकशी करण्याची मागणी केली.

यासंदर्भात आयुक्तांना चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहे. महापालिकेला अद्यापपर्यंत पूर्ण वेळ आयुक्त मिळत नसल्याने चौकशीचे घोंगडे भिजत पडले आहे.

दरम्यान, प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील यांची बदली झाली असली तरी अद्यापही त्यांच्या नावाने आदेश निघत असल्याची बाब समोर आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC Ghode Patil
Sharad Pawar : वय ८२ असो वा ९२ मला फरक पडत नाही; शरद पवारांनी स्पष्ट केले इरादे

चुकीच्या कामांची जबाबदारीची भीती

घोडे- पाटील यांच्या कार्यकाळात तयार करण्यात आलेले प्रस्ताव आता स्वाक्षरीला येत आहे. नवीन प्रशासक आले असले तरी त्यांच्याकडून घोडे- पाटील यांची स्वाक्षरी असलेलेच प्रस्ताव सादर केले जात आहे.

यामागे यापूर्वी झालेल्या चुकीच्या कामाची जबाबदारी आपल्यावर येऊ नये, त्यामुळे घोडे यांच्या कार्य काळामध्ये मंजूर झालेल्या कामांच्या प्रस्तावांवर त्यांचीच स्वाक्षरी घेऊन प्रस्ताव मंजूर केले जात असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

असा प्रकार आला उघडकीस

महापालिकेच्या प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानायत यांच्या स्वाक्षरीचे सेवा व प्रवेश नियमावली संदर्भातील परिपत्रक ४ जुलैला जारी करण्यात आले.

या परिपत्रकावर प्रशासन उपायुक्त म्हणून लक्ष्मीकांत साताळकर यांची स्वाक्षरी होणे अपेक्षित होते, मात्र त्यावर महिन्याभरापूर्वी बदली झालेल्या घोडे- पाटील यांची स्वाक्षरी आढळून आली.

"माजी प्रशासन उपायुक्तांच्या कार्यकाळात सेवा व प्रवेश नियमावलीची संचयिका आयुक्तांच्या स्वाक्षरीसाठी प्रलंबित होती. ती संचयिका आता मंजूर झाल्याने मनोज घोडे- पाटील यांची स्वाक्षरी दिसून येत आहे."- लक्ष्मीकांत साताळकर, प्रशासन उपायुक्त, महानगरपालिका.

NMC Ghode Patil
Ajit Pawar Mumbai NCP: अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष नेमला!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.