esakal | भाऊ..नो हॅण्डशेक इन फेस्टिवल; आपला "नमस्कार"च बरा हाय!
sakal

बोलून बातमी शोधा

namskar.jpg

कोरोनाचं सावट अजूनही संपलेलं नाही. त्यात लॉकडाऊनमुळे गेले ३-४ महिने नातेवाईक, आप्तेष्टांना भेटणंही झालेलं नाही. त्यातच सध्याचा काळ हा सण-उत्सवाचा असल्याने अनेक जणं आता आपल्या लोकांना भेटण्यासाठी आतुर झाले असतीलही. लॉकडाऊन शिथिल झाल्यानं आता एकमेकांना भेटणं जरी काहीरित्या सोयीचे झाले असले तरी योग्य काळजी घेणे अत्यावश्यकच आहे

भाऊ..नो हॅण्डशेक इन फेस्टिवल; आपला "नमस्कार"च बरा हाय!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोरोनाचं सावट अजूनही संपलेलं नाही. त्यात लॉकडाऊनमुळे गेले ३-४ महिने नातेवाईक, आप्तेष्टांना भेटणंही झालेलं नाही. त्यातच सध्याचा काळ हा सण-उत्सवाचा असल्याने अनेक जणं आता आपल्या लोकांना भेटण्यासाठी आतुर झाले असतीलही. लॉकडाऊन शिथिल झाल्यानं आता एकमेकांना भेटणं जरी काहीरित्या सोयीचे झाले असले तरी योग्य काळजी घेणे अत्यावश्यकच आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन, सण साजरे करताना आपलं कुटुंब आणि मित्र निरोगी व सुरक्षित आहेत हे सुनिश्चित करणंही तितकचं आवश्यक आहे. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी येथे काही टिप्स दिल्या आहेत.

आपला नमस्कार किंवा रामरामच बरा

 कोणालाही भेटताना हात मिळवण्यापेक्षा 'नमस्कार' या भारतीय अभिवादन पद्धतीचा वापर करा. जगभरात कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात अनेक घोषणांमध्ये हात मिळविण्यापेक्षा नमस्कार करण्याचा उल्लेख झाला. यामुळे आपल्याला तसेच आपल्या आप्तस्वकीयांना कोरोनाचा धोका कमी होईल.

बाहेरचं खाणं नको रे बाबा! 

सणादरम्यान घराबाहेर न खाणंच बरं आहे. गर्दीच्या ठिकाणी संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते आणि यामुळे पोटात संक्रमणदेखील होऊ शकतं त्यामुळे आपल्या प्रतिकारशक्तीवर आणि एकूण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

लक्षणे त्वरीत तपासावी

कोरोनाची जराही लक्षणं आढळल्यास अंगावर न काढता त्याची खात्री करा. इतरांना धोका होऊ नये यासाठी व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी सण आपल्या घरीच कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत साजरा केला पाहिजे.

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

गैरसमज टाळा

अनेक लोकं असा विचार करतात की, त्यांना हा रोग होणार नाही किंवा झाला तरी बरा होईल. परंतु या रोगावरची लस जगात कुठेही नसल्यामुळे असा विचार करून चालणार नाही. अशाने पुन्हा संक्रमण आणि तीव्रतेचं प्रमाण वाढू शकतं.

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा

कोरोनाच्या संपर्कात न येण्यासाठी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग आणि वेळोवेळी साबणाने किंवा सॅनिटायझरने आपले हात धुवावे. हे काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत,ज्यामुळे आपण कोरोनापासून दूर राहू शकतो.

loading image