बिनपगारी- फुल ‘पोलिस विशेष अधिकारी’! लॉकडाउन काळातील कामाचे ‘ना मानधन-ना प्रमाणपत्र’ 

traffic police.jpg
traffic police.jpg

नाशिक : लॉकडाउनच्या काळात शहर वाहतूक शाखेला मदत व्हावी म्हणून प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत ‘पोलिस विशेष अधिकारी’ म्हणून युवकांना नेमले गेले. विशेष पोलिस आधिकारी असे नाव जरी गोंडस असले तरी, त्यातील अनेकांना अद्याप मानधन तर सोडाच, साधे प्रमाणपत्र किंवा टी-शर्टही मिळालेले नाहीत. 

बिनपगारी- फुल अधिकारी ‘पोलिस विशेष अधिकारी’ 

लॉकडाउनच्या काळात रस्त्यावर महत्त्वाच्या ठिकाणी उभे राहून वाहतूक पोलिसांबरोबर किंबहुना जास्तच हे युवक सेवा बजावत होते. त्यांना पांढऱ्या रंगाचे व त्यावर ‘पोलिस विशेष अधिकारी’ असे नाव असलेले टी- शर्ट देण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांत त्या युवक अधिकाऱ्यांचा चांगलाच दबदबा निर्माण झाला होता. या विशेष अधिकाऱ्यांनी रोज सहा ते आठ तास काम केले. हे काम चार ते सहा महिने सुरू होते. त्याच्या मोबदल्यात पोलिसानी त्यांना मानधन तर सोडाच, साधे प्रमाणपत्रही दिले नाही. त्यातील काही युवकांनी स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक म्हणून काम केले. त्यामागे त्याचा उद्देशही चांगला होता. आपलं नाशिक कोरोनामुक्त व्हावे, नागरिकांना शिस्त लागावी, हेल्मेट, मास्क वापरावे, सोशल डिस्टन्स पाळले जावे, यासाठी ते प्रयत्नशील होते. तर अनेकांनी केवळ टी- शर्ट मिळवण्यासाठी ड्यूटी केली. 

लॉकडाउन काळातील कामाचे ‘ना मानधन-ना प्रमाणपत्र’ 

‘पोलिस विशेष अधिकारी’ म्हणून काही मिरवले, तर काहींनी वाहनांची अडवणूक करीत दंबगगिरी केली. वेळोवेळी त्यांतील अनेकांना समज दिली गेली. कामावर असाल तेव्हाच हे टी-शर्ट वापरा, फिरताना नको. या पोलिस विशेष अधिकाऱ्यांचा व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला होता. त्यावरून त्याच्या कामाचे ठिकाण व वेळ ठरत असे. हे युवक वाहतूक नियमनाचे काम दोन पाळीत करीत असत. पहिली शिफ्ट सकाळी सात ते दुपारी दोन व दुसरी दुपारी दोन ते रात्री नऊ. या काळात वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना या ‘पोलिस विशेष अधिकाऱ्यां’ची चांगली मदत झाली. काम करूनही काहीच न मिळाल्याने या युवकांच्या पदरी घोर निराशाच पडली. या युवकांची ‘बिनपगारी अन् फुल अधिकारी’ अशीच अवस्था झाली. 

पोलिस ठाण्यानिहाय स्थिती 
पोलिस ठाणे विशेष पोलिस आधिकारी स्थिती 

नाशिक रोड : १४० प्रमाणपत्रे मिळाली. विनामानधन कामाला होते. 
अंबड : ८८ तरुण १८ तरुणी (१०६) मानधन नाहीच व सर्टिफिकेटही नाही. 
पंचवटी : ५८ प्रमाणपत्र मिळाले 
म्हसरूळ : ४२ ३२ जणांना प्रशस्तिपत्र मिळाले. दहा जण बाकी आहेत. 
सातपूर : ४२ ना मानधन, ना प्रमाणपत्र फक्त टी- शर्ट दिले  
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com