मटण, चिकनच्या भावातील उसळीने खवय्यांची कोंडी! सुकटला पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fish market

मटण, चिकनच्या भावातील उसळीने खवय्यांची कोंडी! सुकटला पसंती

पंचवटी (जि.नाशिक) : कोरोनाच्या (coronavirus) वाढत्या उद्रेकाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिकारशक्ती (immunity) वाढविण्याचे अनेकांचे प्रयत्न एकीकडे सुरू आहे. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे अनेकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने (doctor advice) प्रतिकारशक्ती वाढविणारे अन्न सेवन करण्यास प्राधान्य दिले आहे. अर्थात पुरवठ्याच्या तुलनेत मागणीत (demand) प्रचंड वाढ झाली. त्यामुळे भाव गगनाला भिडले आहे. अशातच मांसाहार (nonveg) करणाऱ्या खवय्यांची कोंडी झाली आहे.

खवय्यांची पसंती बोंबील, सुकटला; खरेदीसाठी झुंबड

दुसरीकडे मटण, मच्छीच्या दराने आठशे रुपये किलोपर्यंत मजल मारल्याने अनेक नॉनव्हेज खवय्यांना मटण मच्छीवर फुली मारत बोंबील, सुकट, सुकी मासळी खरेदीला सुरवात केली आहे. त्यामुळे कधीकाळी दिवसभरात जेमतेम ग्राहक दिसणाऱ्या दुकानांसमोरही आता खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: कोरोनाकाळात भाग्य चमकले पण प्रामाणिकपणाने अडविले!

विक्रेत्यांसह सकाळपासून मोठी गर्दी

कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे अनेकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढविणारे अन्न सेवन करण्यास प्राधान्य दिले आहे. अर्थात पुरवठ्याच्या तुलनेत मागणीत प्रचंड वाढ झाल्याने अनेक ठिकाणी एक किलो मटणासाठी साडेसातशे ते आठशे रुपये मोजावे लागत आहे. याशिवाय मुंबईहून मागविण्यात येणाऱ्या खाऱ्या पाण्यातील वाम, पापलेट, कोळंबी आदी माशांच्या मागणीतही मोठी वाढ झाल्याने त्याचेही दर सर्वसामान्यांच्या आटोक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे दिवसाआड नॉनव्हेजला पसंती देणाऱ्या अनेकांची अडचण होत आहे. एकीकडे उद्योग व्यवसाय बंद पडल्याने अगोदरच अनेकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दुसरीकडे नॉनव्हेजच्या दराने मोठी उसळी घेतल्याने अनेकांनी बोंबील, सुकट, सुकी मासळी आदींना पसती दिली आहे. त्यामुळे गंगाघाटासह भद्रकाली मार्केट, भोई गल्ली येथील बोंबील विक्रेत्यांसह सकाळपासून मोठी गर्दी उसळत आहे.

हेही वाचा: ''मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राज्यातील एकाही मंत्र्याला फिरकू देणार नाही"

सुकटचा भाव चारशे रुपयांपर्यंत

अनेक नॉनव्हेज खवैय्यांनी आता पसंतीक्रम बदलला असल्याने बोंबील, सुकटच्या दरांतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मागील महिन्यापर्यंत साडेतीनशे ते चारशे रुपये किलो असलेल्या एक किलो बोंबलासाठी आता पाचशे रुपये द्यावे लागत आहेत. सुकटच्या दरांतही मोठी वाढ झाली असून एक किलो सुकटचा भाव चारशे रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

मटण, चिकनच्या दरांत अलीकडे मोठी वाढ झाली आहे. तज्ज्ञांनी कोरोना संसर्गामुळे मटण, चिकन खाण्याचा सल्ला दिला आहे. मात्र त्याचे दर गगनाला भिडल्याने बोंबील घेणे पसंत केले.- सुरेखा पोरजे, पंचवटी

Web Title: Nonveg Rates High In Market Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Chickenfish
go to top