सतीश निकुंभ नाशिक: उत्तर महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने भरारी घेत असून, नाशिक विभाग आता राज्यात सर्वाधिक वेगाने विकसित होणारा औद्योगिक पट्टा ठरत आहे. २०२४ अखेर विभागात एक हजार ६०० कोटींची निर्यातवाढ नोंदली गेली असून, काही वर्षांत परकीय गुंतवणुकीचा लक्षणीय ओघ वाढला आहे. गुजरातशी असलेल्या रेल्वे व रस्ते संपर्कामुळे धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांतही औद्योगिक गती झपाट्याने वाढली आहे.