esakal | शिक्षकांना नोटीस; सोशल मीडियाचा चुकीचा वापर केल्यास कारवाई

बोलून बातमी शोधा

teacher
शिक्षकांना नोटीस; सोशल मीडियाचा चुकीचा वापर केल्यास कारवाई
sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : महापालिकेचे शिक्षक व शिक्षक संघटनांच्या माध्यमातून व्हॉट्सॲपसारख्या समाज माध्यमांचा चुकीच्या पद्धतीने वापर करताना शिक्षण विभागाची बदनामी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व शिक्षक व संघटनांना पत्राद्वारे व्हॉट्सॲपवर शिक्षण विभागासंदर्भातील माहिती चुकीच्या पद्धतीने प्रदर्शित केल्यास नागरी सेवा नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी सर्व शिक्षकांना दिला आहे. यासंदर्भात सर्व शिक्षकांना यासंदर्भातील नोटीस पाठवली आहे.

हेही वाचा: धक्कादायक प्रकार! एमआयडीसी, अन्न-औषध प्रशासन अधिकाऱ्याकडून ऑक्सिजनची पळवापळवी

सोशल मीडियावर चुकीची माहिती प्रसारित केल्यास कारवाईचा इशारा

महापालिकेच्या शिक्षण मंडळात ९०० हून अधिक शिक्षक व दीडशेहून अधिक कर्मचारी आहेत. शिक्षक व प्रशासनामध्ये तातडीने संवाद साधण्यासाठी व्हॉट्सॲप या समाज माध्यमाचा उपयोग केला जातो. मात्र काही शिक्षकांकडून शिक्षण विभागासंदर्भातील गोपनीय माहिती बाहेर प्रदर्शित करण्याबरोबरच अतिरंजित पद्धतीने काही माहिती पसरवली जात असल्याने शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याची बाब शिक्षण विभागाच्या निदर्शनास आली. त्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय बाबीसंदर्भातील माहिती व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसिद्ध करण्यासाठी आता परवानगी घेण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. शिक्षण विभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय प्रशासकीय बाबी व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसिद्ध झाल्यास गोपनीयतेचा भंग होत असल्याच्या कारणाने महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ मधील कलम ३ व महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ मधील तरतुदीनुसार प्रशासकीय कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व शिक्षकांना यासंदर्भात नोटीस पाठवली असून, शिक्षक व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी शिक्षण विभागाच्या कार्यालयाच्या परवानगीशिवाय कुठलीही माहिती प्रसिद्ध करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा: रुग्ण अन् नातेवाइकांचा तो टाहो.. घटनेची आठवण होताच अजूनही चुकतो काळजाचा ठोका..