आता संपूर्ण महाराष्ट्र होणार ''सुपोषित''; महिला, बालविकास विभागाचा नवा उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

malnutration-764x430.jpg

या उपक्रमांतर्गत ८०८०८०९०६३ हा हेल्पलाइन क्रमांक तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून स्तनदामाता, बालकांचे पालक यांच्याशी संवाद साधून सुपोषणाबाबत माहिती, मार्गदर्शन केले जाणार आहे. 

आता संपूर्ण महाराष्ट्र होणार ''सुपोषित''; महिला, बालविकास विभागाचा नवा उपक्रम

नाशिक : ‘सक्षम महिला, सुदृढ बालक, सुपोषित महाराष्ट्र’चे ध्येय साध्य करण्यासाठी आणि पोषण आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महिला व बालविकास विभागातर्फे ‘तरंग सुपोषित महाराष्ट्र’ डिजिटल प्लॅटफॉर्म उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत देण्यात आलेल्या हेल्पलाइन क्रमांकाच्या माध्यमातून राज्यातील सर्व महिला, मुली, तसेच बालक यांना पोषण आहारासंदर्भात मोफत सल्ला मिळणार आहे. 

‘तरंग सुपोषित महाराष्ट्र’ उपक्रम 

पोषण आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील महिला व बालविकास विभागातर्फे ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ हा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. हा आय.व्ही.आर. (इंटरॲक्टिव्ह वॉइस रिस्पॅान्स) प्रणालीवर आधारित डिजिटल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. या उपक्रमांतर्गत ८०८०८०९०६३ हा हेल्पलाइन क्रमांक तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून स्तनदामाता, बालकांचे पालक यांच्याशी संवाद साधून सुपोषणाबाबत माहिती, मार्गदर्शन केले जाणार आहे. 

हेही वाचा > साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच; बाईकवरून शिर्डीवर निघालेल्या तीन तरुणांवर काळाचा घाला

व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनसुद्धा माहिती 

व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनसुद्धा पोषणविषयक माहिती चित्रफितींच्या माध्यमातून घरोघरी पोचविले जाणार आहे. यासाठी खास पाककृतीची माहिती व्हिडिओ मालिकेच्या स्वरूपातही दिली जाणार आहे. ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’मध्ये हेल्पलाइन, ब्रॉडकास्ट कॉल, व्हॉट्सॲप चॅटबोटचा समावेश आहे.  

हेही वाचा >  निर्दयी मातेनेच रचला पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट; अंगावर काटा आणणारा संतापजनक प्रकार उघड 

Web Title: Now You Will Get Health Information Mobile Number Nashik Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Social MediaNashik