Nashik : छाटणीनंतर पालापाचोळा रस्त्यावर; डासांच प्रमाण वाढतयं

वीज वितरण विभागाच्या पावसाळापूर्व कामानिमित्त उच्च दाबाच्या तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांच्या छाटणीचे काम सुरू आहे.
Tree cutting
Tree cuttingesakal

जुने नाशिक : वीज वितरण विभागाच्या पावसाळापूर्व कामानिमित्त उच्च दाबाच्या तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांच्या छाटणीचे काम सुरू आहे. त्यातून निघणारा पालापाचोळा फांद्या रस्त्यावरच टाकल्या जात आहे. त्यातून विविध समस्यांना निमंत्रण मिळत आहे.

यंदा पावसाचा जोर अधिक असणार असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय कुठल्याही वेळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा वेळेस मुसळधार पाऊस, वादळवारा यामुळे वृक्ष कोसळून झाडामुळे उच्च दाबाच्या तारा तुटणे त्यातून अपघात घडणे असे प्रकार होत असतात.

यामुळे वीज वितरण विभागाकडून आत्तापासूनच पावसाळापूर्व कामाचे नियोजन करत शहराच्या विविध भागात कामांना सुरवात केली आहे.

Tree cutting
Nashik : 4 हजारांची लाच घेताना कनिष्ठ लिपिकाला अटक

उच्च दाबाच्या तारांवर पसरलेल्या वृक्षांच्या फांद्या छाटणीला प्राधान्य दिले जात आहे. दुसरीकडे वृक्षांच्या फांद्या छाटणीनंतरचा पालापाचोळा रस्त्यावरच, तसेच सोसायट्यांच्या प्रवेशद्वारावर सोडून दिला जात आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली आहे. परिसरात बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. इतकेच नव्हे तर वाहने पालापाचोळ्यावर घसरून अपघात घडत आहे. अशाप्रकारचा पालापाचोळा महापालिकेच्या आरोग्य विभाग घंटागाडी कर्मचाऱ्यांकडून उचलून देण्याच्या सूचना आहे. घंटागाडी कर्मचाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक दिवस वृक्ष छाटणीचा पालापाचोळा तसाच रस्त्यावर पडून राहत आहे. मोठी दुर्घटना घडण्याची वाट जणू त्यांच्याकडून बघितली जात आहे. अशा तक्रारी परिसरातील नागरिक करत आहे. मोकाट जनावरेदेखील पालापाचोळा रस्त्यावर ओढत असल्याने वाहनचालकांना अडचण निर्माण होत आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घंटागाडी कर्मचाऱ्यांना आदेशित करून पालापाचोळा उचलण्याच्या सूचना करण्यात याव्यात.

Tree cutting
Nashik : फसवणूक करणाऱ्या 3 महिलांना 3 वर्ष कारावास

वीज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनीदेखील रस्त्यात पालापाचोळा टाकू नये. छाटणी होताच महापालिका अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घंटागाडी कर्मचाऱ्यांना बोलावून घेत तो कचरा उचलण्यास सांगण्यात यावे, अशी मागणी नागरिक करत आहे. याशिवाय पालापाचोळ्यामुळे परिसरात डासांचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्यातून आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याचेही नागरिकांकडून तक्रारी केल्या जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com