Nashik Crime: नायलॉन मांजा विक्रेते गजाआड; मखमलाबादला गुन्‍हे शाखा युनिट 1 ची कारवाई

बेकायदेशीररीत्या नायलॉन मांजा विक्री करणारे विक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबत पोलिस आयुक्‍त संदीप कर्णिक, गुन्‍हेशाखेचे पोलिस उपायुक्‍त प्रशांत बच्छाव यांनी कारवाईच्‍या सूचना केल्‍या होत्‍या.
A team of Crime Branch Unit One with the suspects seized from Makhmalabad on Friday along with the banned nylon panty.
A team of Crime Branch Unit One with the suspects seized from Makhmalabad on Friday along with the banned nylon panty.esakal

नाशिक : बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्‍यावर पोलिसांनी धडक कारवाई करत विक्रेत्यांना गजाआड करताना त्‍याच्‍याकडील ३३ हजार रुपयांचा मांजा जप्त केला आहे.

गुन्‍हा शाखेच्‍या युनिट एकने ही कामगिरी केली आहे. (Nylon manja sellers rampant Action by Crime Branch Unit 1 at Makhmalabad Nashik Crime )

बेकायदेशीररीत्या नायलॉन मांजा विक्री करणारे विक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबत पोलिस आयुक्‍त संदीप कर्णिक, गुन्‍हेशाखेचे पोलिस उपायुक्‍त प्रशांत बच्छाव यांनी कारवाईच्‍या सूचना केल्‍या होत्‍या.

त्‍याअनुषंगाने गुन्हे शाखा युनिट एक येथे नियुक्‍त पोलिस अंमलदार राजेश राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत मखमलाबाद येथील स्वामी विवेकानंदनगर भागात दोघांकडून बंदी असलेला नायलॉन मांजाची विक्री सुरु असल्‍याचे कळताच पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

A team of Crime Branch Unit One with the suspects seized from Makhmalabad on Friday along with the banned nylon panty.
Dharashiv Crime News : दोन घरफोड्या; दहा लाखांचा मुद्देमाल चोरीला

वरीष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, अंमलदार मिलींदसिंग परदेशी, राजेश राठोड, राहुल पालखेडे, मुक्तार शेख, अमोल कोष्टी आदींनी सापळा लावून नायलॉन मांजा विक्रीसाठी आणणाऱ्या विकास देवरे (वय २७, रा. मखमलाबाद), अभिषेक भंडागे (वय-२१, रा. मखमलाबाद) या दोघांना ताब्‍यात घेत त्‍यांच्‍याकडील दोन प्लॅस्टीकच्या गोण्यांमध्ये असलेले ४३ नग बंदी असलेला मोनोकाईट कंपनीचे नायलॉन मांजाचे गट्टू जप्त केले. या मालाची किंमत ३३ हजार ६०० रुपये आहे.

संशयितांविरोधात म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल केला आहे. पतंग उडविण्यासाठी बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा वापर न करण्याचे आवाहन पोलिस विभागाने नागरिकांना केले आहे.

A team of Crime Branch Unit One with the suspects seized from Makhmalabad on Friday along with the banned nylon panty.
Dhule Crime News : मोहाडी उपनगरात एकाच रात्री चोरीसत्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com