नाशिक : महाबँक कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी पुकारला संप

Officers and employees of Mahabank on strike
Officers and employees of Mahabank on strikeesakal

डीजीपी नगर (नाशिक) : महाबँक कर्मचाऱ्यांच्या संपात डेप्युटी चीफ लेबर कमिशनर, मुंबई यांनी केलेली मध्यस्थी विफल झाल्यामुळे २७ सप्टेंबर रोजी गडकरी चौकातील महाबँकेच्या विभागीय कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांसह महाबँकेतील सर्व कर्मचारी संघटनांनी एकत्रित येऊन प्रथमच संपाची हाक देत संपात सहभागी होत घोषणाबाजी केली. या आंदोलनात प्रलंबित मागण्यांना शासनाने त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

या आहेत प्रमुख मागण्या

प्रामुख्याने नोकर भरतीच्या प्रश्नावर बँकेत सफाई कर्मचारी तसेच शिपायांची अनेक पदे रिक्त आहेत. अनेक वर्षांपासून जे या पदावर तात्पुरते कर्मचारी म्हणुन काम करत आहेत त्यांना सेवेत सामावून घ्यावे व ही रिक्त पदे भरावीत अशी संपकरी संघटनांची मागणी आहे. याशिवाय बँकेने अनेक वर्षांपासून मृत्यु, निवृत्ती, राजीनामा, पदोन्नती या कारणांमुळे रिकाम्या झालेल्या लिपिक पदाच्या रिक्त जागा देखील भरलेल्या नाहीत; मग बँकेने उघडलेल्या नवीन शाखा आणि त्यामुळे वाढलेला व्यवसाय यामुळे निर्माण झालेली अतिरिक्त कर्मचार्‍यांची गरज तर वेगळीच आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार रजा मिळत नाही. मधल्या काळात जनधन, सामाजिक सुरक्षितता विमा योजना, पेंशन योजना, मुद्रा यासारख्या योजनांमुळे वाढलेला कामाचा बोजा लक्षात घेता कर्मचाऱ्यांना विलक्षण तणावाखाली काम करावे लागत आहे. याचा ग्राहक सेवेवर देखील विपरित परिणाम होत आहे हे लक्षात घेता बँकेने त्वरित लिपिक वर्गात पुरेशी भरती करावी अशी संघटनेतर्फे मागणी करण्यात येत आहे. या शिवाय खर्चात कपात या नावाखाली बँकेने सर्व शाखा आणि एटीएम येथील सुरक्षारक्षक काढून घेतले आहेत ते त्वरित नेमावेत अशी संघटनांची मागणी आहे.

Officers and employees of Mahabank on strike
धर्मांतर रॅकेटचे नाशिक कनेक्शन; कुणाल चौधरी उर्फ आतिफला अटक

बँकेने प्रशासकीय बदल्यांचे आदेश मागे घ्यावे... 

याशिवाय सतर्कता आयोगाचा दाखला देत बँक कोरोना (Corona) महामारीच्या काळात बँकेतील लिपिक वर्गाच्या बदल्या करून जी अमानवी वागणूक देत आहे, त्यावर देखील संघटनेतर्फे तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. अशी मागणी करण्यात येत आहे की, बँकेने त्वरित प्रशासकीय बदल्यांचे आदेश मागे घ्यावेत.

दरम्यान बँकेतील दोनही अधिकारी संघटनांनी संपाला पाठिंबा जाहीर करत कर्मचारी  संघटनांशी समन्वयाने त्यांच्या प्रश्नांसाठी आजच्या संपात उस्फुर्त पणे सहभागी होवून प्रलंबित मागण्या पूर्ण करून शासनाने आम्हाला न्याय दयावा अशी मागणी केली आहे.

Officers and employees of Mahabank on strike
'आता नदीला पूर, नंतर आसवांचा महापूर!'; आदिवासींची व्यथा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com