हाउज द जोश! नाशिकच्या ओमची काश्मीर ते कन्याकुमारी सायकल मोहीम; विश्वविक्रमासाठी प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

om mahajan

शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींमध्ये सायकलचा वापर वाढावा हा संदेश देण्यासाठी त्याने ही मोहीम सुरू केली आहे.

हाउज द जोश! नाशिकच्या ओमची काश्मीर ते कन्याकुमारी सायकल मोहीम; विश्वविक्रमासाठी प्रयत्न

नाशिक/इंदिरानगर : अमेरिकेतील खडतर अशी रॅम सायकल स्पर्धा जिंकणारे पहिले भारतीय डॉ. हितेंद्र आणि डॉ. महेंद्र महाजन यांच्या कुटुंबातील सदस्य आणि डॉ. जितेंद्र यांचा मुलगा ओम (१७) शुक्रवारी (ता १३) पहाटे पाचला श्रीनगर येथून काश्मीर ते कन्याकुमारी हे चार हजार किलोमीटरचे अंतर आठ दिवसांत सायकलने पार करण्याच्या (केटूके) मोहिमेला सुरवात करणार आहे. 

असा असणार मार्ग ​

गीनिज बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि वर्ल्ड अल्ट्रा सायकलिंग असोसिएशनच्या विश्वविक्रमासाठी तो प्रयत्न करणार आहे. शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींमध्ये सायकलचा वापर वाढावा हा संदेश देण्यासाठी त्याने ही मोहीम सुरू केली आहे. मोहिमेचे ‘बी कुल...पेडल टू स्कूल’ हे घोषवाक्य आहे. श्रीनगर, दिल्ली, झाशी, नागपूर, हैदराबाद, बेंगळुरू, मदुराई आणि कन्याकुमारी असा मार्ग असणार आहे.

हेही वाचा >  भाजप नेत्याच्या वाढदिवसाचा भररस्त्यात जल्लोष! पोलिस प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

नाशिकचा झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर?

रोज पाचशे किलोमीटर अंतर कापण्याचे उद्दिष्ट त्याने ठेवले आहे. नाशिक सायकलिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष दिवंगत जसपालसिंग बिर्दी यांना त्याने ही मोहीम समर्पित केली आहे. बारावीपर्यंत फ्रावशी ॲकॅडमीचा विद्यार्थी असलेल्या ओमने आतापर्यंत सायकलचाच वापर शाळा आणि महाविद्यालयासाठी केला आहे. अनेक राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धांमध्ये त्याने राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. यंदा त्याने अमेरिकेत स्पोर्ट्स व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असून, ठरवलेल्या वेळेत हे अंतर कापून विश्वविक्रमाला गवसणी घालत नाशिकचा झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा झळकवणार असल्याचा विश्वास त्याने व्यक्त केला. नितीन ठक्कर, महाजन बंधू, डॉ. अंजना महाजन, डॉ. नितीन रौंदळ, मिलिंद वाळेकर, सागर बोंदार्डे, पूर्वांश लखलानी, बलभीम कांबळे, कबीर राचुरे, नेहा पाटील आणि राहुल भांड ही ‘टीम ओम इंडिया’ संयोजन करणार आहे. 

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

loading image
go to top