esakal | येवल्यात एक कोटीचा अवैध मद्यसाठा जप्त राज्य; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

बोलून बातमी शोधा

null
येवल्यात एक कोटीचा अवैध मद्यसाठा जप्त राज्य; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : गोव्यात विक्रीची परवानगी असलेल्या तब्बल एक कोटी रुपयांचा अवैध मद्यसाठा येवला टोलनाका परिसरात शनिवारी (ता.२४) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक व येवला पथकाने सापळा रचून पकडला. मुद्देमालासह ट्रक ताब्यात घेण्यात आला असून, दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

दुपारी तीनच्या सुमारास येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोल नाका येथून ट्रक (यूपी- ८२- टी- ९०७७) मधून शौचालय बांधणीसाठी लागणाऱ्या सिरामिक भांड्यांच्या आडोशाला वाढलेल्या गवतात केवळ गोवा राज्यातच विक्रीची परवानगी असलेला विदेशी मद्यसाठा इतर राज्यांत विक्रीसाठी नेला जात होता. याची माहिती नाशिक उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोहर अंचुळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथक तयार केले होते. या पथकात उत्पादन शुल्क निरीक्षक आर. एम. फुलझळके, सहाय्यक निरीक्षक भरारी पथक एच. एस. रावते, सहाय्यक निरीक्षक ए. पी. पाटील, येवला निरीक्षक व्ही. ए. चौरे यांनी सापळा रचून भगवांदास कुशवाह (४१), विनोद कुशवाह (३६, दोघे रा. राजस्थान) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली

हेही वाचा: नाशिक ग्रामीणला कोरोनाचा विळखा घट्ट! दैनंदिन आकड्यात शहराला पछाडले