esakal | तो एकीकडे..अन् हेल्मेट एकीकडे, बस स्टॉपकडे वळताना अ‍ॅक्टिवाला जोरदार धडक.. 
sakal

बोलून बातमी शोधा

dhananjay gosavi acc.jpg

विद्यार्थी वाहतूक करणारी बस ही शिवाजीनगर बस थांबा कडे जाण्यासाठी वळत असताना अ‍ॅक्टिवाला जोरदार धडक दिली. यामध्ये धनंजय गोसावी खाली पडल्याने त्याच्या डोक्यातील हेल्मेट देखील दुसरीकडे पडले. यामुळे धनंजयच्या डोक्यास गंभीर मार लागला.

तो एकीकडे..अन् हेल्मेट एकीकडे, बस स्टॉपकडे वळताना अ‍ॅक्टिवाला जोरदार धडक.. 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जेलरोड शिवाजीनगर येथील मनपाच्या समाज मंदिराजवळील चौकात विद्यार्थी वाहतूक करणाया बसने अ‍ॅक्टिवाला धडक दिल्याने शालिमार येथील युवक गंभीर जखमी होऊन जागीच फार झाला.

असा घडला प्रकार...

शालिमार येथील वारेलेफ येथे राहणारा युवक धनंजय बाबूगिर गोसावी (३८) हा मंगळवारी सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास आपली अ‍ॅक्टिवा (एम एच १५ /बीएच ७४७१) हिच्यावरून जेलरोड शिवाजीनगर मनपा समाज मंदिर येथील चौकातून उजव्या बाजूला वळत होता. यावेळी माळी कॉलनी कडून आलेली विद्यार्थी वाहतूक करणारी बस (एमएच१५ जीव्ही/ ४२९२) ही शिवाजीनगर बस थांबा कडे जाण्यासाठी वळत असताना अ‍ॅक्टिवाला जोरदार धडक दिली. यामध्ये धनंजय गोसावी खाली पडल्याने त्याच्या डोक्यातील हेल्मेट देखील दुसरीकडे पडले. यामुळे धनंजयच्या डोक्यास गंभीर मार लागून तो जागीच ठार झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात बस चालक आकाश मधुकर गांगुर्डे रा. जेतवननगर, नाशिकरोड याच्याविरुध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय याच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा व मुलगी असा परिवार आहे.", 

हेही वाचा > जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुलामुलींची धांदल उडते....पोलिसही चक्रावले! 

हेही वाचा > थरारक! साक्षात समोर मृत्यू उभा असताना "माऊलीला" कुठे जीवाची पर्वा होती? तिचा जीव बाळामध्येच...