esakal | पहाटेची वेळ...जुना वाडा कोसळतो तेव्हा.. अंगावर काटा आणणारी दुर्घटना..!
sakal

बोलून बातमी शोधा

wada bhadrakali.jpg

पहाटेची साडे चारची वेळ..नाशिकच्या भद्रकाली भाजी बाजार परिसरात टॅक्सी स्टॅण्ड असून, त्यापाठीमागे मातंगवाडी आहे. येथे बागुल यांचे दुुमजली वाडा होता...अचानक एक मोठा आवाज झाला..अन् सारे काही उध्वस्त झाले..वाचा अंगावर काटा आणणाऱ्या दुर्घटनेचा थरार...

पहाटेची वेळ...जुना वाडा कोसळतो तेव्हा.. अंगावर काटा आणणारी दुर्घटना..!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पहाटेची साडे चारची वेळ..नाशिकच्या भद्रकाली भाजी बाजार परिसरात टॅक्सी स्टॅण्ड असून, त्यापाठीमागे मातंगवाडी आहे. येथे बागुल यांचे दुुमजली वाडा होता...अचानक एक मोठा आवाज झाला..अन् सारे काही उध्वस्त झाले..वाचा अंगावर काटा आणणाऱ्या दुर्घटनेचा थरार...

पहाटेची ती दुर्दैवी घटना...
राजेंद्र बोरसे असे या दूर्घटनेत मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. तर, वाड्याचे मालक सुनील दामू बागुल, सुनीता बागूल, राजू खराटे हे तिघे जखमी झाले आहेत. भद्रकाली भाजी बाजार परिसरात टॅक्सी स्टॅण्ड असून, त्यापाठीमागे मातंगवाडी आहे. येथे बागुल यांचे दुुमजली वाडा असून, त्याची एक भिंत बुधवारी (ता. ८) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ढासळली. यात वाड्यातील भाडेकरू राजेंद्र बोरसे हे ढिगाऱ्याखाली सापडून जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. राजू खराटे (५८), सुनील बागुल, सुनीता बागुल हे तिघे जखमी झाले. बागुल यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून, खराटे यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

...यामुळे दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज
अग्निशमन मुख्यालयातील एक बंब, कोणार्कनगर नाशिक विभागीय कार्यालयातील एक बंबासह जवान काही मिनिटांतच घटनास्थळी पोहोचले. लिडिंग फायरमन श्याम राऊत, बंब चालक गणेश गायधनी, फायरमन राजेंद्र पवार, किशोर पाटील, उदय शिर्के, विजय शिंदे यांनी मदतकार्य केले. अग्निशमन दलाच्या तीन बंबांसह जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून मलब्याखाली अडकलेल्या वृध्दाला बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. तर, डोक्याला व छातीला मलब्याचा गंभीर मार लागल्याने युवकाचा मृत्यु झाला. पहाटेपासून सकाळी आठ वाजेपर्यंत मलबा हटविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, वाघ यांच्या घरावर शेजारील वाड्याची जीर्ण भिंत कोसळल्याने सदरची दुर्घटना घडल्याच प्राथमिक अंदाज आहे.

हेही वाचा > काय सांगता..! कोरोना प्रतिबंधासाठी नारळ व खोबरे तेल ठरतेय रामबाण उपाय...प्राथमिक संशोधनातून समोर

खराटेचा आवाज...
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. कोसळलेल्या मलब्याखाली किती जण अडकले याची कोणतीही माहिती नसल्याने जवानांसमोर मोठा प्रश्‍न उभा राहिला. मात्र, खराटे यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून जवानांनी मलबा बाजूला करीत त्यांना बाहेर काढले. रूग्णवाहिकेतून त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांना किरकोळ मार लागला होता. वेळीच मदत पोहोचल्याने त्यांचे प्राण वाचले.

तरुणांसह पोलिसांनी मदतकार्यात सहभाग

भद्रकाली परिसरातील जुना वाडा बुधवारी (ता. ८) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली सापडून २० वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला. तर एका महिलेसह तिघे जखमी झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन राबविले तर, परिसरातील तरुणांसह पोलिसांनी मदतकार्यात सहभाग घेतला.

हेही वाचा > हॅलो..सैन्यदलातून बोलतोय..समोरून भामट्याने घातला असा गंडा..


स्थानिकही धावले...
तर, पहाटेच्या सुमारास घडलेल्या या दूर्घटनेमुळे परिसरातील छत्रपती सेनेचे निलेश शेलार, संजय परदेशी, चेतन शेलार, रवी साठे, लक्ष्मण बंदरे, गणेश मंडाले, संतोष तूपसुंदर, कैलास थोरात, रितेश डोईफोडे यांच्यासह परिसरातील तरुणांनी त्वरित मदत कार्यास सुरुवात केली. यामुळे ढिगाऱ्याखालून जखमींना बाहेर काढण्यात मदत मिळाली.   

loading image
go to top