Nashik Accident News: ओझर येथे कारची ज्युपिटरला धडक; एकाचा मृत्यू

भरधाव कारने ज्युपिटर स्कूटरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ज्युपिटरस्वाराचा मृत्यू झाला असून, दहा वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
Sanish Mandalik died in an accident
Sanish Mandalik died in an accidentesakal

Nashik Accident News : येथील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोडवर भरधाव कारने ज्युपिटर स्कूटरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ज्युपिटरस्वाराचा मृत्यू झाला असून, दहा वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. (one killed in accident with car ozar nashik Accident News)

शुक्रवारी (ता. २२) रात्री सव्वादहाच्या सुमारास सनिश सुरेश मंडलिक (वय ३८, रा. शिवाजीनगर, ओझर) हे मुलगी आराध्या (वय १०) हिच्यासह त्यांच्या ज्युपिटर स्कूटरने (एमएच १५, एचएस १८९४) सायखेडा फाट्याकडून सर्व्हिस रोडने घरी जात असताना त्याच सुमारास नाशिककडून भरधाव येणाऱ्या इऑन कारने (एमएच ०४, एफआर २९६४ ) श्री लॉन्सजवळ ज्युपिटरला जबरदस्त धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्कूटरस्वार सनिश व मुलगी आराध्या गंभीर जखमी झाले.

Sanish Mandalik died in an accident
Nashik Accident News: खड्डे टाळण्याच्या नादात दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार

त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, डॉक्टरांनी सनिश यांना तपासून मृत घोषित केले, तर गंभीर जखमी आराध्यावर औषधोपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ओझर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक मच्छिंद्र कोल्हे अधिक तपास करीत आहेत.

Sanish Mandalik died in an accident
Nashik Accident News: कंटेनर-रिक्षाच्या अपघातात महिला ठार; दोघे गंभीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com