Nashik Agriculture News : कांद्याच्या मागणीत वाढ; बळीराजाच्या पदरी निराशाच!

Onion
Onionesakal

Nashik News : देशांतर्गत आणि आखाती देशांमध्ये कांद्याची मागणी वाढल्याने गेल्या काही दिवसांमध्ये कांद्याच्या भावामध्ये सुधारणा होताना दिसत आहे.

सध्या आशिया खंडातील मोठी बाजार समिती असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला सरासरी एक हजार ३७० रुपये, तर जास्तीत जास्त दोन हजार ७०१ रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे. (Onion demand increases domestically and in Gulf countries nashik Agriculture news)

यंदा वादळी वाऱ्यासह पाऊस, तर काही ठिकाणी गारपिटीमुळे काढणीच्या अवस्थेतच कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कांदा साठवण केल्यानंतर कांदा चढण्याचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

बळीराजा आता हळूहळू चांगला कांदा गरजेनुसार विक्रीसाठी बाजार समितीत नेत आहेत. मात्र कांद्याच्या प्रतवारीनुसार शेतकऱ्याला सध्या दर मिळत आहेत. एकीकडे भावात जरी सुधारणा दिसत असली तरी बदलत्या वातावरणामुळे कांद्याच्या प्रतवारीमध्ये कमालीची घट झाल्याने मिळणाऱ्या दरातून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच दिसत आहे.

बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा सडण्यास सुरवात झाल्याने शेतकरी प्रतवारी करून बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणत आहे. ऐनपावसाळ्याच्या तोंडावर देखील बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची प्रचंड आवक दिसत आहे. भाव जरी उंच दिसत असले तरी प्रत्यक्षात मिळणाऱ्या दरातून फारकाही शेतकऱ्यांच्या हातात मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमीत कमी ६००, सरासरी एक हजार ३७०, तर जास्तीत जास्त दोन हजार ७०१ रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Onion
Nashik Agriculture News : जुलै उजाडला, शेतकरी हबकला; पावसाअभावी अवघी 20 टक्के पेरणी

शेतकऱ्यांच्या मनात साशंकता

बांगलादेशची सीमा भारतीय शेतीमालासाठी खुली झाल्याने कांदा बाजारात काहीअंशी तेजी दिसत आहे. मात्र कांदा बाजारभाव तेजीचा आलेख किती दिवस स्थिर राहातो याबाबत शेतकऱ्यांच्या मनात साशंकता निर्माण होत आहे.

"बांगलादेशात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आयात सुरू झाली. त्यामुळे कांद्याला मागणी वाढली आहे. पण वाहतूकखर्च सहा ते साडेसहा रुपये प्रतिकिलो येतो, हा त्यासाठी न परवडणारा आहे. केंद्र सरकारने किसान रेल उपलब्ध करून दिल्यास निर्यातीला चालना मिळून जिल्ह्याच्या कांद्याला मागणी वाढेल व शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे मिळतील." - मनोज जैन, कांदा निर्यातदार, लासलगाव

"सध्या उन्हाळा कांद्याची साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल आहे, पण टिकवणक्षमता नसल्याने कांद्याच्या चाळीमधील कांदा मोठ्या प्रमाणात सडण्यास सुरवात झालीय आहे. त्यामुळे शेतकरी कांदा निवडून विक्रीस नेत आहे. पण हे प्रमाण इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात कमी आहे, त्यामुळे बांगलादेशात या कांद्याला प्रथम पसंती मिळत आहे." -निवृत्ती न्याहारकर, कांदाउत्पादक, वाहेगाव साळ, चांदवड

Onion
Onion Subsidy : कांद्याला देण्यात येणारे अनुदान न मिळाल्याने शेतकरी चिंतेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com