Jayakumar Rawal
sakal
नाशिक/मुंबई: कांद्यावरील निर्यातशुल्क १.९ टक्क्यांवरून ४ टक्के करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली असून, त्याबाबतचा निर्णय लवकरच होईल, अशी माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी मंगळवारी (ता. १६) पत्रकार परिषदेत दिली. तसेच कांदा दरातील पडझडीबाबत बोलाविलेल्या बैठकीत ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांना पणनमंत्री रावल यांच्यासह अन्य मंत्र्यांनी झापले.