esakal | ब्रेकनंतर येवल्यात कांदा लिलाव सुरू; पण बाजारभावात मात्र घसरण 

बोलून बातमी शोधा

onion sakal 123.jpg

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीतील ११ दिवसांच्या सुट्ट्यांनंतर सोमवारी (ता. ५) कांदा लिलाव पूर्ववत सुरू झाले. मात्र लाल व उन्हाळ कांदा बाजारभावात घसरण झाल्याने शेतकऱ्‍यांना मोठा भुर्दंड सहन करावा लागला. 

ब्रेकनंतर येवल्यात कांदा लिलाव सुरू; पण बाजारभावात मात्र घसरण 
sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीतील ११ दिवसांच्या सुट्ट्यांनंतर सोमवारी (ता. ५) कांदा लिलाव पूर्ववत सुरू झाले. मात्र लाल व उन्हाळ कांदा बाजारभावात घसरण झाल्याने शेतकऱ्‍यांना मोठा भुर्दंड सहन करावा लागला. 

शेतकऱ्‍यांना मोठा भुर्दंड
बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवारात सोमवारी ९०० ट्रॅक्टरमधून सुमारे २८ हजार क्विंटल लाल व उन्हाळ कांद्याची आवक झाली. ११ दिवसांपूर्वी येवला बाजार समितीत लाल कांद्यास प्रतिक्विंटल किमान ४०० ते कमाल एक हजार ५० (सरासरी ८००) रुपये असे बाजारभाव होते. सोमवारी लाल कांदा किमान व सरासरी बाजारभावात शंभर रुपये, तर कमाल बाजारभावात १८५ रुपयांची घसरण झाली. लाल कांद्यास प्रतिक्विंटल किमान ३०० ते कमाल ८६५ (सरासरी ७००) रुपये असा बाजारभाव मिळाला. येथे उन्हाळ कांद्यास प्रतिक्विंटल किमान ४०० ते कमाल ९८५ (सरासरी ७५०) रुपये असा बाजारभाव होता.

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

येवल्यात कांदा बाजारभावात घसरण 

अंदरसूल उपबाजार आवारात ३०० रिक्षा, पिक-अप आणि २५० ट्रॅक्टरमधून सुमारे नऊ हजार क्विंटल कांदा आवक झाली. येथे लाल कांद्यास किमान ३०० ते कमाल ८०० (सरासरी ६५०) रुपये बाजारभाव मिळाला.  

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी