ओझर- देशभरातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर घाला घालणाऱ्या सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या कांदा साठा घोटाळ्यावरील याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. पिंपळगाव बसवंत येथील शेतकरी विश्वासराव मोरे यांनी दाखल केलेल्या या फौजदारी याचिकेवर १७ जून २०२५ ला सुनावणी झाली असून, पुढील सुनावणी १५ जुलैला निश्चित करण्यात आली. याचिकाकर्ते मोरे यांनी ही माहिती दिली.