esakal | उस्मानाबादचा खूनी दरोडेखोर नाशिकमध्ये जेरबंद; सिग्नलवर विकत होता फुल-गजरे
sakal

बोलून बातमी शोधा

criminal

उस्मानाबादचा खूनी दरोडेखोर नाशिकमध्ये जेरबंद

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : दरोड्यात एकाचा खून करून पसार झालेल्या उस्मानाबाद येथील दरोडेखोरास नाशिक पोलिसांनी जेरबंद केले. संशयीत उस्मानाबादला खूनानंतर नाशिकला शहरातील सिग्नलवर फुलांचे गजरे विक्री करून कुटूंबियांचा उदरनिर्वाह करायचा. मुंबई नाका पोलिसांनी ही कारवाई केली असून, त्यास उस्मानाबाद पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. सुनिल नाना काळे (२७ पारधी पेढी ता.कळम,उस्मानाबाद) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. (Osmanabads-murderer-robber-arrested-in-Nashik-marathi-news)

धाडसी दरोडा टाकून गाठले नाशिक

गेल्या ५ मेस उस्मानाबाद जिह्यातील कळम तालूक्यात धाडसी दरोडा टाकण्यात आला होता. त्यात एका सुरक्षा रक्षकाची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी कळम पोलिस ठाण्यात दरोड्यासह खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उस्मानाबाद पोलिस दरोडेखोरांच्या मागावर असतांनाच नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली. उस्मानाबाद जिह्यातील अनेक कुटूंबिय नाशिक शहरातील सिग्नलवर गजरे विक्री करीत असल्याच्या माहितीवरून कळम पोलिसांचे पथक दोन दिवसांपूर्वी शहरात दाखल झाले होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून मुंबईनाका पोलिसांची यंत्रणा कामाला लागली होती. वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी किनारा हॉटेल पाठीमागील नंदिनी नदी किनारी संशयीतास जेरबंद करण्यात आले. संशयिताने उस्मानाबाद येथील गुह्याची कबुली दिली आहे. घटनेनंतर संशयीताने नाशिक गाठून सिग्नल परिसरात गजरा विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. त्यास उस्मानाबाद पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.

(Osmanabads-murderer-robber-arrested-in-Nashik-marathi-news)

हेही वाचा: मनविसेची जबाबदारी दिल्यास स्विकारणार - अमित ठाकरे

हेही वाचा: पिस्टल दुरुस्त करणं पडलं महाग, पोलिस कर्मचाऱ्याच्या मांडीत घुसली गोळी

loading image