'अर्ली' द्राक्षांवर पावसामुळे रोगांचा प्रादुर्भाव, यंदाची गोड द्राक्षे होणार आंबट; वाचा सविस्तर

 Outbreak of disease on arli grapes due to rain nashik marathi news
Outbreak of disease on arli grapes due to rain nashik marathi news
Updated on

नाशिक /अंबासन : जिल्ह्यात 58367.43 हेक्टरवर द्राक्षे लागवड असून कसमादे परिसर अर्ली द्राक्षे हंगामासाठी अग्रेसर आहे. मात्र नोव्हेंबरमध्ये बाजारात उपलब्ध होणाऱ्या द्राक्ष उत्पादनाला यंदा फटका बसण्याची चिन्हे आहेत. सततचे बदलते हवामान व पावसाच्या फटक्याने डावनी, बुरी व कुज रोगाने आक्रमण केले आहे. यामुळे यंदा द्राक्षे 'आंबट' लागण्याचीच शक्यता अधिक आहे.

हवामान बदलामुळे नुकसान

परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आता बदलत्या हवामानाशी सामना करावा लागत आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप असल्याने द्राक्ष बागेवर डावण्या, बुरी व कुजचा प्रादुर्भाव वाढला आहे. सततच्या हवामान बदलामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत. बिजोटे (ता.बागलाण) येथील द्राक्ष उत्पादक अभिमन जाधव यांनी सांगितले की, सन 1990 मध्ये सुरूवातीला दोन एकरात द्राक्षे बाग उभी केली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वीस एकरात वाढवलेली आहे. मागील वर्षीही अतिशय खराब वातावरण होते. झाडांवर तयार झालेले द्राक्षे पाच ते सहा रूपये दिला तरीही कुणी व्यापारी घेत नव्हते हाती काहीच लागले नाही. यावर्षी जुलै महिन्यात छाटणी घेतली मात्र हवामान व अति पाऊसामुळे बागेत डावनी व कुज रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

फवारणीचा उपयोग होईना

भरमसाठ किमंतीची औषध फवारणी करूनही पाहिजे तसा उपयोग जाणवत नाही. त्यामुळे द्राक्षे उत्पादक पुर्ण कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. अशा परिस्थितीत द्राक्षे बागा उभ्या कराव्या तरी कशा हिच चिंता सतावत आहे. मागील वर्षी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरदरावजी पवार, माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी या परिसरात नुकसानग्रस्त द्राक्षे बागांची पाहणी केली होती. त्यावेळी द्राक्षे उत्पादक शेतक-यांनी अर्ली द्राक्षे पिकविम्याबाबत चर्चा केली होती. मात्र अर्ली हंगामी द्राक्षेसाठी विमाकवच देण्याकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप द्राक्षे उत्पादक करीत आहेत. कसमादे पट्ट्यातील द्राक्षे उत्पादक परकीय चलन आणुन देणारा पट्टा असल्याचे उत्पादकांनी सांगितले. पावसामुळे उत्तम चवीची द्राक्षे यंदा हाती येतील, याचीही उत्पादकांना शाश्वती नसल्याने बहुतेक द्राक्षे उत्पादक शेतक-यांनी द्राक्षे बागा सोडून दिल्याची चर्चा परिसरात होत आहे.

...मागिल वर्षी चार एकर क्षेत्रात लाखों रूपये खर्च केले होते. मात्र पावसामुळे काहीही उपयोग झाला नाही. यावर्षी डावनी, भुरी व कुज रोगाने आक्रमण केले पाऊसाने उघडीप देताच फवारणी सुरू होते. डावनी, कुज पाहिजे तेवढा आवाक्यात येत नाही.  - लोटन जाधव, द्राक्षे उत्पादक बिजोटे. 

जिल्ह्यातील द्राक्षे लागवड हेक्टरवर (कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार)

नाशिक - 11671,

इगतपुरी - 150,

पेठ - 1,

त्रंबक - 216,

निफाड - 22003,

सिन्नर - 1135,

येवला - 688,

चांदवड - 5148,

मालेगाव - 714,

सटाणा - 650, 

नांदगाव - 38,

कळवण - 88.5,

दिंडोरी - 15758.93,

सुरगाणा - 36,

व देवळा - 70 

संपादन - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com