नाशिक : भरधाव कंटेनरने पोल, झाडे तोडली; 2 मुले बचावली

Container
Containeresakal

मालेगाव (जि. नाशिक) : महामार्गावरुन (Highway) शहरातील कॅम्प भागात भरधाव वेगाने घुसलेल्या कंटेनरने (युके ०४ सीए ९३७०) वीजेचे खांब, झाडे तोडली. कंटेनर कॅम्प भागातील गवळी वाड्यातील अरुंद गल्लीत घुसल्याने खेळत असलेली दोन लहान मुले थोडक्यात बचावली. मद्यधुंद (Drunked) स्थितीत असलेल्या कंटेनर (Container) चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महामार्गावरुन थेट कॅम्प भागात आलेल्या या अवजड वाहनाने वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. कंटेनर कॅम्पात आलाच कसा, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. गल्लीत घुसलेल्या कंटेनरमुळे सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांनी पोलिस प्रशासनाचे वाभाडे काढत संताप व्यक्त केला. महामार्गावरुन कन्टेनर जुन्या महामार्गाने शहरात घुसला. (overspeed container cuts poles and trees 2 children saved Nashik Accident News)

मोसम चौकातून कॅम्प रस्त्याने तो सोमवार बाजारात आला. तेथून तो थेट गवळी वाड्यात घुसला. वेगाने आलेला कंटेनर पाहून गल्लीत खेळत असलेली दोन लहान मुले पळाली. त्यामुळे ती थोडक्यात बचावली. कंटेनर गवळी वाड्यातील जय महाकाली चौकातील महाकाली मंदिराजवळील सिंहाजवळ थांबला. वेगाने आलेल्या कंटेनरने काही लहान झाडे व वीजेचे खांब तोडले. या भागातील वीज तारा लोंबकळत होत्या. अचानक आवाज येवून वीजप्रवाह खंडीत झाल्याने गवळीवाडा भागातील नागरीक घराबाहेर आले. कॅम्प पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आली. पोलिसांनी मद्यधुंद स्थितीत असलेल्या आलम खान (वय २७, रा. राजस्थान) याला ताब्यात घेतले. कंटेनर शहरात कसा घुसला, याची चौकशी पोलिस करीत आहेत.

दरम्यान, या घटनेने शहरातील वाहतूक शाखेचे कामकाज चव्हाट्यावर आले आहे. अवजड वाहन समजले जाणारे कंटेनर तेही भरधाव वेगाने घुसलेच कसे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. महामार्गावरुन शहरात पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गवळी वाड्यापर्यंत कंटेनर पोहोचेपर्यंत पोलिसांना ते दिसले नाही का, असा प्रश्‍न विचारला जात आहे. या घटनेचा वंदे मातरम्‌ संघटनेने तीव्र निषेध केला आहे. संघटनेचे अध्यक्ष जगदीश गोऱ्हे यांनी यासंदर्भात वाहतूक पोलिसांना निवेदन दिले आहे.

Container
Nashik : भंगाराच्या 2 दुकानांना आग

...तर तीव्र आंदोलन छेडू

कंटेनरसारखी अवजड वाहने शहरात प्रवेश करीत असताना वाहतूक पोलिस काय करीत होते? वर्दळीच्या भागात खेळणारी लहान मुले महाकालीच्या कृपेमुळे वाचली. सुदैवाने मोठी हानी टळली असली तरी हा प्रकार गंभीर आहे. चार दिवसांपूर्वी कॅम्प भागात ट्रकने नागरिकांना उडविले. मोसम चौकातील सिग्नल यंत्रणा बंद आहे. शहरात वाहतूक शिस्तीचे तीन तेरा वाजले आहेत. पोलिस फक्त सामान्य नागरीकांना नियम सांगतात. यापुढे असे प्रकार घडल्यास वंदे मातरम संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्री. गोऱ्हे यांनी दिला आहे.

Container
Nashik : उन्हामुळे डाळिंबाला कही खूशी कही गम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com