esakal | स्टील क्षेत्रातील ऑक्सिजन उत्पादन वृद्धीने महाराष्ट्राच्या अपेक्षा उंचावल्या

बोलून बातमी शोधा

steel industry
स्टील क्षेत्रातील ऑक्सिजन उत्पादन वृद्धीने महाराष्ट्राच्या अपेक्षा उंचावल्या
sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनसाठी पोलाद क्षेत्राने योगदान देण्यास सुरवात केली आहे. पोलाद क्षेत्रात सार्वजनिक आणि खासगी असे ३३ ऑक्सिजन प्रकल्प असून, २९ नियमितपणे सुरू आहेत. त्यातून दिवसाला दोन हजार ८३४ टन लिक्विड ऑक्सिजनचे उत्पादन होते. शनिवारी (ता. २४) ६४० टनाने अधिकचे म्हणजेच तीन हजार ४७४ टन लिक्विड ऑक्सिजनचे उत्पादन झाले. पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस २२ एप्रिलला विशाखापट्टणमच्या स्टील प्रकल्पातून शंभर टन लिक्विड ऑक्सिजन घेऊन महाराष्ट्राकडे निघाली. पोलाद क्षेत्रात लिक्विड ऑक्सिजनचे उत्पादन वाढल्याने महाराष्ट्राच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

पोलाद क्षेत्रातील ऑक्सिजन उत्पादन वृद्धीने महाराष्ट्राच्या अपेक्षा उंचावल्या

बहुतेक कारखान्यांनी नायट्रोजन आणि ऑरगॉनचे उत्पादन कमी केले आहे. केवळ वैद्यकीय लिक्विड ऑक्सिजनचे उत्पादन करत आहेत. पूर्वीच्या आठवड्यात दीड हजार आणि सतराशे टन दररोजच्या तुलनेत खासगी आणि सार्वजनिक पोलाद प्रकल्पांतर्फे शनिवारी (ता. २४) वेगवेगळ्या राज्यांत दोन हजार ८९४ टन ऑक्सिजन पाठविण्यात आला. पोलाद कारखान्यांना स्टील तयार करण्यासाठी आणि ब्लास्ट फर्नेसेसमध्ये ऑक्सिजन संवर्धनासाठी गॅसयुक्त ऑक्सिजनची आवश्यकता असते. म्हणूनच इंटिग्रेटेड स्टील प्लांट्समधील कॅप्टिव्ह ऑक्सिजन प्लांट्सची रचना ऑक्सिजन, नायट्रोजन आणि ऑरगॉनची प्रामुख्याने वायू उत्पादने तयार करण्यासाठी केली आहे. नंतर इच्छित दाबाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रेशर रिडक्शन ॲन्ड मॅनेजमेंट सिस्टिमद्वारे (पीआरएमएस) केली जातात. असे कारखाने क्षमतेपेक्षा पाच ते सहा टक्के अधिक लिक्विड ऑक्सिजन तयार करू शकतात. तो औद्योगिक ऑक्सिजनच्या तुलनेत शुद्ध उत्पादन आहे. या दरम्यान द्रव ऑक्सिजनचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि वितरित करण्यासाठी खासगी अथवा सार्वजनिक क्षेत्रातील सर्व ऑक्सिजन प्रकल्प चोवीस तास आणि आठवडाभर कार्यरत आहेत. पोलाद प्रकल्पात ऑक्सिजन सिलिंडर भरून ते राज्य आणि रुग्णालयांना देण्यात येत आहेत.

हेही वाचा: गाजरवाडीची कृषिकन्या गाजवणार युद्धभूमी! बनली तालुक्यातील पहिली महिला फौजी

लिक्विड ऑक्सिजन पुरवठा

- दररोज ८०० टनांहून अधिक वितरण झाले

- २३ एप्रिलला एक हजार १५० टनांचे वितरण

- शनिवारी (ता. २४) ९६० टनांचे वितरण

- ऑगस्ट २०२० पासून भिलाई, बोकारो, रुरकेला, दुर्गापूर, बर्नपूरहून शनिवार (ता. २४)पर्यंत ३९ हजार ६४७ टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा

- २०२०-२१ मध्ये आठ हजार ८४२ टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा

- १३ एप्रिलपासून आज सकाळपर्यंत तेराशे टन वैद्यकीय लिक्विड ऑक्सिजन पाठविला (तीन दिवसांमध्ये शंभरवरून १४० टनांपर्यंत वाढ)