उन्हामुळे भात रोपांवर सुकवा; पावसाअभावी रोपे करपण्याची भीती

Paddy crop
Paddy cropsakal

खेडभैरव (जि. नाशिक) : आर्द्रा नक्षत्राच्या सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने इगतपुरी तालुक्यात शेतकऱ्यांकडून भात रोपांची लागवड करण्यास सुरवात झाली. भाताची रोपे लावणीयोग्य होण्याच्या मार्गावर असतानाच मागील आठ-दहा दिवसांपासून तालुक्यात पावसाने दडी मारल्याने उन्हाळा ऋतूसारखे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, शेतात पाणी नसल्याने भातलागवड खोळंबली असून, भात रोपांवर उन्हामुळे सुकवा आला आहे. यामुळे लागवड झालेली रोपे करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.


या वर्षी तालुक्यात २८ हजार हेक्टरवर भात पिकाची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाला सुरवात झाली होती. यामुळे शेतकऱ्यांनी भात पेरणीची कामेही वेगात पूर्ण केली. आता लागवडीसाठी रोपेही तयार झाली आहेत. परंतु मागील आठ ते दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने व सर्वत्र उन्हाळी वातावरण तयार झाल्याने आता शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भातलागवड करावयाच्या खाचरांमध्ये पाणीच नसल्याने लागवड करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे.

पाण्याअभावी रोपे पडू नये म्हणून रोपे वाचविण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या मार्गाने रोपांना पाणी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे पाणी देण्याची सोय उपलब्ध नाही, असे शेतकरी पावसाच्या तीव्र प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात जर पुढील काही दिवस असेच वातावरण राहिल्यास पावसाअभावी भात लावणीची कामे लांबणीवर पडून रोपे वाया जाण्याची शक्यता आहे. भात रोपांसह नागली, वरई, भुईमूग, मका इत्यादी कडधान्ये पिकांनाही पाण्याची तीव्र गरज असल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

Paddy crop
सावधान! नाशिक शहरात डेंग्यू, चिकनगुनिया रुग्णांमध्ये वाढ

पीक क्षेत्र (हेक्टरमध्ये)
भात २८ हजार
नागली ९१७
मका १२२
कडधान्ये १९०
भुईमूग ३६८
सोयाबीन ९११
खुरासणी ६००

भात रोपे आवणीसाठी तयार होण्याच्या मार्गावर होती; मात्र गेल्या आठ दिवसांपासून चांगला पाऊस न पडल्याने भात रोपांवर सुकवा जाऊ लागला आहे. रोपांना पाणी देण्यासाठी दुसरे साधन उपलब्ध नसल्याने पावसाची वाट पहावी लागणार आहे.
-रामू पोकळे, शेतकरी (भावली बुद्रुक, ता.इगतपुरी)


(Paddy crop in Igatpuri taluka is in danger due to lack of rains)

Paddy crop
हेलिकॉप्टरने आली लग्नाची वरात! वरासोबत डॉ. अमोल कोल्हेही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com