नाशिक : रंगकाम करणाऱ्यांनीच दागिन्यांवर मारला डल्ला

thief
thiefesakal

नाशिक : तिडके कॉलनीत बंगल्याच्या रंगकामाला बोलावलेल्या परप्रांतीय कारागिरांनी २३ लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारला. याप्रकरणी गौरव अतुल चांडक यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

संजय यादव (वय २८, रा. नरोरा तहसील, कानपूर उत्तरप्रदेश), साहिल मकसूद अहमद मन्सुरी (२७, गुठैय्या, बकेवर, जि. फतेहपूर, उत्तर प्रदेश) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी चांडक सर्कल येथील गौरव अतुल चांडक (३३, गौरव बंगला) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

thief
Crime Alert : सोनसाखळी चोरट्यांचा शहरात धुमाकूळ

२७ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान दोघी संशयितांना बंगल्याच्या रंगरंगोटीचे काम मिळाले होते. त्यांनी गौरव बंगल्यातील ३०० ग्रॅमचे सोन्याचे बिस्कीट, ८ लाख ५० हजारांची रोकड, असा सुमारे २३ लाख ५० हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.

thief
Nashik : 13 लाखांची धाडसी घरफोडी; दागिने व रक्कम लंपास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com