Nashik News: पळसाच्या पानाचे घोंगडे झाले दुर्मिळ!

 Palas Leaf
Palas Leafesakal

Nashik News : जिल्ह्यात पंधरा ते वीस वर्षांपूर्वी पावसाळ्यात शेतीची कामे करताना संरक्षण आणि ऊब मिळावी यासाठी वापरण्यात येत असलेले पळसाच्या पानाचे घोंगडं आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.

काही अपवादात्मक ठिकाणी वापर केला जात आहे. मात्र, खेडोपाडी आता पांघोडे दुर्मिळ होत चालले आहे. ( Palasa leaf blankets became rare Nashik News)

पावसात भातशेतीचे काम करत असताना भिजू नये म्हणून आणि शरीराला ऊब मिळण्यासाठी वापर करतात. यात इरले-घोंगडी पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात वापरले जात होते. मात्र आता बदलत्या जीवनशैलीच्या परिणामामुळे ग्रामीण भागातून पळसाच्या पानाचे घोंगडे दुर्मिळ होत आहे.

सध्या आधुनिक युगात रेनकोटचा आणि पांघरता येणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर वाढतो आहे. मेहनत करून वस्तू तयार करण्यापेक्षा तयार वस्तू बाजारात मिळतात. पावसाळ्यात त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, जव्हार व मोखाडा तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी लोक पळसाची पाने, बांबू आणि अंबाडीचे सूत (दोरा) काढून पान घोंगडी बनविण्याचे काम करत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 Palas Leaf
Nashik News: राज्यातील 12 लाख बसची तिकीट तपासणी; वर्षभरात 6589 फुकट्या प्रवाशांकडून 16 लाख वसूल

यातून आदिवासी बांधवांना पैसेही मिळत; परंतु जसा काळ बदलत चाललेला आहे, तशा प्रकारच्या रूढी, परंपरा व व्यवसाय, साधनेदेखील बदलत जाऊन त्याची जागा अत्याधुनिक साधनांनी घेतली आहे.

५०० ते १००० रुपयांत मिळणाऱ्या प्लॅस्टिकचा कोट पावसापासून जरी बचाव करीत असला तरी पानघोंगडीप्रमाणे थंडीपासून बचाव करत नाही. शरीराला ऊब देणारा नाही; हेच पान घोंगडं अवघ्या ३०० ते ४०० रुपयांत तर घोंगडी ५०० ते ६०० रुपयांपर्यंत मिळत असे.

पान-घोंगडी हे पाच ते सहा वर्षांपर्यंत वापरता येते; परंतु सध्या पान-घोंगडीचा वापर खूप कमी झाल्याने त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

 Palas Leaf
Nashik News: बाजार समितीचा कारभार पुन्हा संचालक मंडळाकडे; प्रशासकांची नियुक्ती शासनाकडून रद्द

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com