esakal | इच्छा तेथे मार्ग! यंदाचे पर्युषण पर्व होणार ऑनलाईन; वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

paryushan festival will be online in homes instead of temple nashik marathi news

ऑनलाईन सोहळ्यात 14 साधू संत सम्मिलित होणार आहे.रोज रात्री होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात हजारों रुपयांचे बक्षिसही दिले जाणार आहे धूपदशमीच्या दिवशी भारतातील 108 मंदिरात धूप चढविण्याचा कार्यक्रम ही ऑनलाईन करण्यात येत आहे.

इच्छा तेथे मार्ग! यंदाचे पर्युषण पर्व होणार ऑनलाईन; वाचा सविस्तर

sakal_logo
By
विजय पगारे

कोरोनामुळे यंदाचे पर्युषण पर्व ऑनलाईन : जैन समाजातील सर्वात मोठया धार्मिक सोहळ्यात झुमद्वारे सहभाग : 

 
नाशिक/ इगतपुरी : समस्त जैन समाजातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा म्हणजे पर्युषण पर्व म्हणुन ओळखला जातो दरवर्षी या पर्व काळात विविध धार्मिक उपक्रम राबवले जातात या काळात संपूर्ण जैन समाजाचे व्यक्ती जास्तीत जास्त वेळ मंदिरात व्यतित करुन धर्मध्यान करतात.तसेच दिवसभर साधु संताच्या सानिध्यात मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले जातात.

डिजीटल पर्युषण पर्व

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या नियमानुसार कोणतेही धार्मिक आयोजन करता येणार नाही त्यामुळे सगळीकडे निराशामय वातावरण होते  मात्र इच्छा तेथे मार्ग या उक्तिनुसार श्री भारतवर्षीय दिगंबर जैन युवा महासभा महाराष्ट्र, राजस्थान मध्यप्रदेश-तेलंगाणा शाखेद्वारे जैन बांधवासाठी डिजीटल पर्युषण पर्वाची संकल्पना सुरु केली याद्वारे ‘जैनम झूम’चैनलच्या माध्यमातुन घरी बसल्या दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते सकाळी ध्यान,अभिषेक,नित्य नियम पूजा,साधू संतांचे प्रवचन,सामूहिक माळा जाप,तत्वार्थ सूत्रावर व्याख्यान प्रतिक्रमण,आरती,दशधर्म प्रवचन,विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

सर्वच कार्यक्रम ऑनलाईन

यामध्ये ऑनलाईन सोहळ्यात 14 साधू संत सम्मिलित होणार आहे.रोज रात्री होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात हजारों रुपयांचे बक्षिसही दिले जाणार आहे धूपदशमीच्या दिवशी भारतातील 108 मंदिरात धूप चढविण्याचा कार्यक्रम ही ऑनलाईन करण्यात येत आहे. ज्यांना यामध्ये सहभागी व्हावयाचे आहे त्यांनी प्राथमिक रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे.झूम ॲपच्या माध्यमातुन होत असल्याने आम्ही सिमित लोकांनाच यामध्ये घेवु शकतो म्हणुन सर्वांनी लवकरात लवकर रजिस्टर करुन घ्यावे आतापर्यंत सुमारे पाच हजार पेक्षा जास्त लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे.कोरोनाच्या काळात समाजातील व्यक्ति सुरक्षीत रहावी व धर्मध्यान करुन पुण्यही मिळविता यावे यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी आनंद काला,अजय पापडीवाल राहुल साहुजी,विपुल साहुजी धीरज कासलीवाल,राकेश जैन,चपलमन,पूर्वी शाह,सुनिता पाटणी,सुजाता बडजाते,राशी लोहाडे,योगिता पांडे,दिपाली गांधी मयुरी पाटणी आदिसह विविध भागातील पदाधिकारी परिश्रम घेऊन कार्यरत आहेत 

हेही वाचा > दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?

काय शिकवते पयुर्षण पर्व

 पयुर्षण पर्वाचा काळ अत्यंत पवित्र मानला जातो या काळात प्राणीमात्रांवर दया,वैरभाव,द्वेषभावना दुर करणे,जीवन जगण्याची पद्धत,ह्रदयात प्रसन्नता निर्माण करणे,अहींसेचा संदेश मनामनात पोहोच करणे,शांती व बंधुभावची शिकवण देतो शिवाय या काळात लौकीक पर्वात आत्मसाधना व लोकोत्तर पर्वात आत्मशुध्दीची शिकवण दिली जाते 

 मानवी जीवन आनंदमय,सुखी व समृध्द होण्यासाठी धार्मिक अनुष्ठान होणे आवश्यक आहे पयुर्षण काळात आत्मशुध्दी होत असते म्हणुन हा काळ पवित्र मानला जातो यंदा हा काळ ऑनलाईन झाला असला तरी आनंद देणारा ठरला आहे 
- अजित लुणावत,उपासक इगतपुरी 

हेही वाचा > धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?कारवाई तर होणारच

loading image
go to top