Nashik News: थंडीत दर वाढूनही आरोग्यवर्धक सुकामेव्याची चलती; मेथी, डिंकासह खारीक-खोबऱ्याच्या लाडुंना पसंती

थंडीच्या दिवसांत प्रकृतीमान व आरोग्य सुधारण्यासाठी प्रत्येक घरात सुकामेवा खाण्याबरोबर मेथीचे व डिंकाचा लाडू बनविले जात आहेत.
people eating Healthful dry fruits in winter nashik news
people eating Healthful dry fruits in winter nashik news

Nashik News: इगतपुरी तालुक्यासह सर्वत्र थंडीचा कडाका सुरु झाला आहे. हिवाळा आरोग्यवर्धक असल्यामुळे सुकामेव्याची चलती आहे. खारीक, खोबरे, डिंक आणि काजू, बदाम यासह पौष्टिक खाण्याकडे विशेषतः तरुणांचे कल अधिक आहे. सुकामेव्याचे दर गेल्यावर्षापेक्षा अधिक असले तरीही सुकामेवा खरेदी करण्याकडे गृहिणींचा कायम आहे.

थंडीच्या दिवसांत प्रकृतीमान व आरोग्य सुधारण्यासाठी प्रत्येक घरात सुकामेवा खाण्याबरोबर मेथीचे व डिंकाचा लाडू बनविले जात आहेत. (people eating Healthful dry fruits in winter nashik news)

मिठाई व लाडू बनविताना त्यात खारीक, खोबरे, बेदाणे, काजू, बदामाचा समावेश केला जातो. लाडूसाठी खारीक, खोबऱ्याची मागणी अधिक असल्याने ग्रामीण भागामध्ये घरोघरी, वस्त्यांवर जाऊन खारीक, खोबरे, डिंकाची विक्री करण्याचा व्यवसायाला बरकत आली आहे.

डिंकाच्या लाडूसोबत काजू, बदाम, मनुका, अक्रोड, चारोळी, खारीक, खजूर अशा आरोग्यवर्धक सुकामेव्याला पसंती मिळत आहे. लहान मुलांनाही हे खाद्यपदार्थ आवडतात. सुकामेव्याचा समावेश असलेले रव्याचे, बेसनाचे, मेथीचे लाडू घरोघरी तयार होऊ लागले आहेत.

सुकामेव्याचे दर

(आकडे किलोला रुपयांमध्ये दर्शवितात)

काजू : ९०० ते ९५०

० बदाम : ८०० ते ९००

० अक्रोड : ८०० ते १२००

० खारीक : ४०० ते ४५०

० खोबरे : २०० ते २५०

० गोडंबी : ८५० ते ९५०

people eating Healthful dry fruits in winter nashik news
Viksit Bharat Sankalp Yatra: ‘विकसित भारत संकल्प’ रथ रोखल्याप्रकरणी देवळा गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस

० डिंक : २८० ते ३५०

० मेथी : १५० ते २५०

० गूळ : ६० ते ८०

० गावरान तूप (म्हशीचे ) : ६०० ते ९००

० गावरान तूप (गायीचे ) : ५०० ते ७००

"बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या ‘फास्ट फूड’चा जमाना असला, तरी आरोग्याच्या सदृढतेसाठी व चांगले पोषणमूल्य मिळण्यासाठी सुक्यामेव्याचा वापर करण्याबाबत आहार तज्ज्ञांकडून सांगितले जाते. सुकामेवा खाल्ल्याने १५ ते २० टक्के आजार कमी होतात. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांत सुकामेवा व खारीक-खोबऱ्याच्या लाडुंना प्रथम पसंती असते. त्यामुळे खरेदीचा कल कायम राहिला आहे." - यशोदा सोनवणे, गृहिणी

people eating Healthful dry fruits in winter nashik news
Gajanan Maharaj Paduka: श्री गजानन महाराजांच्‍या चैतन्‍य पादुका नाशिकमध्ये; भाविकांना संपर्काचे आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com