esakal | ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरसाठी लोकांनी गाठले जिल्हाधिकारी कार्यालय! जिल्हाधिकाऱ्यांचे काटकसरीचे आवाहन

बोलून बातमी शोधा

collector office Nashik

ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरसाठी लोकांनी गाठले जिल्हाधिकारी कार्यालय! जिल्हाधिकाऱ्यांचे काटकसरीचे आवाहन

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : शहरात महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटनेने सगळ्यांना हदरवून सोडले आहेत. यातच शहर जिल्ह्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिरचा तुटवडा कायम आहे.

आज (दि.२२) दुपारी ऑक्सिजन संपला म्हणून अनेक खासगी रुग्‍णालयांनी रुग्णांना नेण्यासाठी आग्रह धरला तर रेमडेसिव्हीरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्यामुळे ऑक्सिजन, रेमेडिसिव्हीरच्या तुटवड्याचा प्रश्न पून्हा ऐरणीवर आला. दरम्यान, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी रेमडेसिव्हिर व ऑक्सिजन काटकसरीने वापर करण्याचे आवाहान केले.

रुग्णालयांना ऑक्सिजन मिळत नसल्याने आज इंडियन मेडीकल असोसिएशनच्या नेतृत्वाखाली शहरातील डॉक्टरांनी जिल्हाधिकारी मांढरे यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या छोटेखानी बैठकीत मांढरे यांनी रुग्णालयांना काटकसरीने रेमडेसिव्हीर व ऑक्सिजन वापराचा सल्ला दिला.

रुग्णालयात ऑक्सिजन टंचाई

जिल्ह्यात ऑक्सिजनचा तीव्र टंचाई निर्माण झाली असून आज गुरवारी अनेक खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन नसल्याने रुग्णांच्या उपचाराचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी आॅक्सीजन १३९ मेट्रीक टन मागणी असून ८५ मेट्रीक टन उपलब्ध होतो. तूट भरुन काढण्यासाठी १७ ड्युरा सिलेंडरची मागणी केली आहे. १० मिळाले. नगर आणि औरंगाबादहून २ टॅकर मागविले. केंद्र व राज्य शासनाकडून ऑक्सिजनचा पुरवठा नियंत्रित केल्याने रुग्णालयांनी प्रति मिनीट ऑक्सिजन पुरवठा नियंत्रित करुन काटकसरीने ऑक्सिजन वापरता येईल का, गरज असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन वापर करावा असे आवाहान केले.

हेही वाचा: Breaking : धक्कादायक! नाशिक शहरातील 5 हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा

६ हजाराच्या तुलनेत २०० इंजेक्शन

जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा आहे. साधारण ६ हजार इंजेक्शनची मागणी असलेल्या जिल्ह्याला जेमतेम २०० इंजेक्शनच उपलब्ध होत असल्याने तीव्र टंचाईतून आज कोरोना बाधीतांच्या नातेवाईकांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळविण्यासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत इंजेक्शनसाठी गर्दी केली. आतापर्यत इंजेक्शनसाठी मेडीकल दुकानासमोर गर्दी करणाऱ्या नागरिकांवर इंजेक्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी करण्याची वेळ आली.

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..