esakal | कांदा खरेदीदर मागणीसाठी संघटनेचे मंगळवारी फोन आंदोलन..केंद्र अन् राज्यमंत्र्यांना करणार विनंती  
sakal

बोलून बातमी शोधा

onion price 3.jpg

राज्यातील कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळतोय. त्यावर उपाय म्हणून केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांचा कांदा थेट २० रुपये किलो दराने खरेदी करून तो देशामध्ये वितरित करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने मंगळवारी सकाळी नऊपासून सायंकाळी पाचपर्यंत आंदोलन पुकारले आहे. 

कांदा खरेदीदर मागणीसाठी संघटनेचे मंगळवारी फोन आंदोलन..केंद्र अन् राज्यमंत्र्यांना करणार विनंती  

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : राज्यातील कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळतोय. त्यावर उपाय म्हणून केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांचा कांदा थेट २० रुपये किलो दराने खरेदी करून तो देशामध्ये वितरित करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने मंगळवारी (ता. २८) सकाळी नऊपासून सायंकाळी पाचपर्यंत आंदोलन पुकारले आहे. 

मंगळवारी सकाळपासून केंद्र अन् राज्यमंत्र्यांना करणार विनंती
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, अन्न- नागरीपुरवठा मंत्री रामविलास पासवान, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस व प्रवीण दरेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, कृषिमंत्री दादा भुसे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह खासदार, आमदारांना शेतकरी फोन करतील. त्यासाठी मंत्री आणि नेत्यांचे संपर्क क्रमांक संघटनेच्या फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येतील. 

हेही वाचा > पुतणीला सतत टोमणे मारणे भोवले काकाला... केले  आत्महत्येस प्रवृत्त


शेतकऱ्यांना होत नाही फायदा 
राज्यातील ३० ते ४० टक्के कांदा चाळींमध्ये सडण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. कांद्याच्या उत्पादनासाठी किलोला ११ ते १२ रुपये असा खर्च येत आहे. मात्र, कांद्याला सरासरी पाच ते सहा रुपये किलो, असा भाव मिळत आहे. देशात ग्राहकांना किलोला २५ ते ३० रुपये द्यावे लागतात. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही, असेही श्री. दिघोळे यांनी स्पष्ट केले.  

हेही वाचा >  संतापजनक! मुलाला भेटायला गेलेल्या विवाहितेला सासरच्यांकडून बेदम मारहाण 

संपादन - ज्योती देवरे

loading image