Nashik News: लासलगाव बाजार समितीतून मंत्री भुजबळांचा फोटो काढला

Chhatrapati Shivaji Maharaj's photo placed in place of Bhujbal's photo in the chairman's hall of Lasalgaon Bazaar Committee.
Chhatrapati Shivaji Maharaj's photo placed in place of Bhujbal's photo in the chairman's hall of Lasalgaon Bazaar Committee.esakal

लासलगाव : राज्यात मराठा आरक्षणाचे वातावरण तापले असून, लासलगाव बाजार समितीमध्ये त्याचे पडसाद दिसून आले. येथेही मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पाहायला मिळत आहे.

ज्यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव बाजार समितीची निवडणूक झाली, असे राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तसेच ओबीसीचे मातब्बर नेते मंत्री छगन भुजबळ यांचा सभापतींच्या मुख्य दालनातील फोटो काढला असून, तेथे आता छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला आहे. (Photograph of Minister Bhujbal from Lasalgaon Market Committee Nashik News)

लासलगाव बाजार समितीच्या गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भुजबळ यांच्या शब्दाला मान दिला. त्यांनी सूचविलेले सभापती-उपसभापती निवडीत त्यांच्या शब्दाला मान मिळला.

मात्र, रविवारी (ता. २२) सायंकाळी सभापतींच्या मुख्य दालनातील मंत्री भुजबळ यांचा असलेला फोटो काढून त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावण्यात आल्याने मराठा विरुद्ध ओबीसीचा संघर्ष दिसून येत आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj's photo placed in place of Bhujbal's photo in the chairman's hall of Lasalgaon Bazaar Committee.
Nashik News: सिन्नर तालुक्याची पैसेवारी 50 पैशांच्या आत! पावसाअभावी खरिपाबरोबर रब्बी हंगामही धोक्यात

सध्या घडत असलेल्या अनेक घडामोडींमध्ये येणाऱ्या काळात भुजबळांना अजून काय काय पाहावे लागते, हे पाहणे औचित्याचे ठरेल.

बाजार समितीचे संचालक प्रवीण कदम, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद पाटील, ज्ञानेश्वर इंगळे, सोनू केदारे यांच्यासह मराठा समाजातील तरुण या वेळी उपस्थित होते.

Chhatrapati Shivaji Maharaj's photo placed in place of Bhujbal's photo in the chairman's hall of Lasalgaon Bazaar Committee.
Maratha Reservation: पंचवीसवर गावांत झळकले नेत्यांच्या गावबंदीचे फलक! मराठा आरक्षणासाठी समाज आक्रमक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com