esakal | ज्या रूद्राला दोन पावलंही चालायला त्रास व्हायचा..त्यानेच केली अशी धडाकेबाज कामगिरी!
sakal

बोलून बातमी शोधा

kalsubai and rudra.png

ट्रेकिंगची सुरवात देवळाली कॅम्प येथील खंडोबाच्या टेकडी अर्थात, टेम्पल हिलपासून केली. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून एक हजार 646 मीटर आहे. तर पायथ्याच्या बारी गावातून याची उंची अंदाजे 900 मीटर आहे. शेवटी येणाऱ्या चार लोखंडी शिड्याही रूद्राने मोठ्या जिद्दीने पार केल्या.

ज्या रूद्राला दोन पावलंही चालायला त्रास व्हायचा..त्यानेच केली अशी धडाकेबाज कामगिरी!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / भगूर : भगूर येथील बांधकाम व्यावसायिक व नगरसेवक दीपक बलकवडे यांचे पुतणे रूद्रा बलकवडे याने वयाच्या पंधराव्या वर्षी दिव्यांगत्वावर मात करून महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर असलेले कळसूबाई शिखर सर केले. कधीकाळी ज्या रूद्राला दोन पावलं चालायलाही त्रास व्हायचा, तोच रूद्र आज ट्रेकिंग करत आहे. 

...अन् अखेर शिखर गाठले
ट्रेकिंगची सुरवात देवळाली कॅम्प येथील खंडोबाच्या टेकडी अर्थात, टेम्पल हिलपासून केली. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून एक हजार 646 मीटर आहे. तर पायथ्याच्या बारी गावातून याची उंची अंदाजे 900 मीटर आहे. शेवटी येणाऱ्या चार लोखंडी शिड्याही रूद्राने मोठ्या जिद्दीने पार केल्या आणि अखेर शिखर गाठले. दिव्यांग रूद्रने कळसूबाई शिखर सर केल्याने देवळाली कॅम्प, विजयनगर, भगूर येथील स्वराज्य सोशल ग्रुपतर्फे अंबादास पवार, सुनील साळुंके, भारत चव्हाण, अमोल भागवत, कैलास खैरनार, सुरेश सूर्यवंशी, प्रमोद वाघ, रूद्रची आई अर्चना बलकवडे, बाबा अरुण बलकवडे यांनी त्याचा सत्कार केला. 

हेही वाचा > हृदयद्रावक! वडिलांचा अंत्यविधी आटपायच्या आतच 'ती' परीक्षा केंद्रावर!...डोळ्यांतील अश्रु थांबता थांबेना...

हेही बघा > VIDEO :...अन् 'त्याने' चक्क नेलकटरने नागाचे दातच काढले!

loading image