Nashik: चिमुकल्‍याच्‍या फुफ्फुसात अडकलेला नारळाचा तुकडा विनावेदना काढला! डॉ. स्वप्नील सांखला यांची कामगिरी

कुठलीही चिरफाड न करता अत्‍याधुनिक स्वरूपाच्या ब्रॉन्‍कोस्‍कोपीद्वारे बालकावर यशस्‍वी उपचार केले असून बारा तासांच्‍या आत घरी सोडले.
Dr. Swapnil Sankhla with a two-year-old child and his parents who were successfully treated at Narayani Hospital.
Dr. Swapnil Sankhla with a two-year-old child and his parents who were successfully treated at Narayani Hospital.esakal

नाशिक : भरपूर उपचार घेऊनही खोकला थांबत नसल्‍याने दोन वर्षीय बालकाचे पालक कासावीस झाले होते. अकोले (ता. संगमनेर) येथील या बालकाला स्‍थानिक डॉक्‍टरांच्‍या सल्ल्‍यानुसार नाशिकच्‍या नारायणी हॉस्‍पिटलमध्ये डॉ. स्वप्नील सांखला यांच्‍याकडे तपासणीसाठी आणले.

फुफ्फुसात नारळाचा तुकडा आढळल्‍याचे निदान करताना कुठलीही चिरफाड न करता अत्‍याधुनिक स्वरूपाच्या ब्रॉन्‍कोस्‍कोपीद्वारे बालकावर यशस्‍वी उपचार केले असून बारा तासांच्‍या आत घरी सोडले. (piece of coconut stuck in toddlers lung removed painlessly Performance by Dr Swapnil Sankhla Nashik)

याविषयी नारायणी हॉस्‍पिटलचे संचालक व फुफ्फुसविकार तज्‍ज्ञ डॉ. स्वप्नील सांखला म्‍हणाले, की दोन वर्षीय बालकाचा खोकला थांबत नसल्‍याने त्‍याच्‍या पालकांनी स्‍थानिक बालरोग तज्‍ज्ञांचा सल्‍ला घेतला.

या वेळी डॉ. देशपांडे व डॉ. अमेय देशमुख यांनी त्‍यांना सिटी स्‍कॅन करण्याचा सल्‍ला दिला. या चाचणीमध्ये फुफ्फुसात उजव्‍या बाजूला काहीतरी अडकलेले असल्‍याचे आढळले. उत्तरीय उपचारासाठी डॉक्‍टरांनी नाशिकला नारायणी हॉस्‍पिटलला भेट देण्याचा सल्‍ला दिला.

त्‍यानुसार बालरुग्‍णासोबत त्‍याचे पालक नारायणी हॉस्‍पिटलमध्ये आले. वैद्यकीय अहवालाचा अभ्यास केल्‍यानंतर फुफ्फुसात नारळाचा तुकडा अडकल्‍याचे लक्षात आले. उपचाराची प्रक्रिया पालकांना समजावून सांगताना पुढील एक तासाच्‍या आत प्रक्रियेला सुरवात केली.

Dr. Swapnil Sankhla with a two-year-old child and his parents who were successfully treated at Narayani Hospital.
Nashik News: जुन्या दुचाकी खरेदीकडे ग्राहकांचा ओढा! नव्या वाहनांच्या वाढत्या किमतीचा परिणाम; विक्रेत्यांसाठी ‘अच्छे दिन’

विशेष म्‍हणजे अडकलेला तुकडा काढण्यासाठी कुठलीही चिरफाड केली नाही. हॉस्‍पिटलमध्ये उपलब्‍ध असलेल्‍या क्‍लायो कंपनीच्‍या अत्‍याधुनिक स्वरूपाच्या मशिनच्या साहाय्याने ब्रॉन्‍कोस्‍कोपीद्वारे नारळाचा तुकडा काढला.

यानंतर बालकाला काही क्षणात मोकळ्याने श्‍वास घेता येऊ लागला व तब्‍येतीत सुधारणा जाणवली. यशस्‍वी उपचार केल्‍यानंतर अवघ्या १२ तासांत त्‍याला डिस्‍चार्ज दिला. याबाबत रुग्‍णाच्‍या पालकांनी समाधान व्‍यक्‍त केले आहे.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे बालकाच्‍या वेदना टळल्‍या व काही तासात तो सामान्‍य जीवन जगण्या सज्‍ज झाल्‍याबद्दल पालकांनी डॉ.स्वप्नील सांखला आणि नारायणी हॉस्‍पिटलच्‍या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.

Dr. Swapnil Sankhla with a two-year-old child and his parents who were successfully treated at Narayani Hospital.
SAKAL Exclusive: 'वाचन' चळवळीसाठी ग्रंथालय, वाचनालयांना मिळावे बळ! वाढती महागाई, खर्च पाहता तुटपुंज्या अनुदानामुळे घरघर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com