Nashik News: भोकणी परिसरात बहरली आमराई; एका वर्षात 5 हजार केशर आंब्यांच्या रोपांची लागवड

Amrai blooming in the area.
Amrai blooming in the area.

Nashik News: रस्त्याच्या दुतर्फा हिरवाई, ऑक्सिजन झोन, नक्षत्र वनापाठोपाठ भोकणी ग्रामपंचायतीने सरपंच अरुण वाघ यांच्या संकल्पनेतून स्वमालकीच्या जागेत १५०० केशर आंब्याच्या रोपांची लागवड केली आहे.

गावातील चारशे कुटुंबांनी १५०० केशर आंब्याच्या रोपांची लागवड केली आहे. एकाच वर्षात गावात पाच हजार रोपांची लागवड झाल्याने आमरई बहरली आहे. भविष्यात केशर आंब्याचे गाव म्हणून भोकणीची ओळख निर्माण होईल.

भोकणी ग्रामपंचायतीच्या गट क्रमांक सहामध्ये नवदृष्टी सप्रेम व डॉर्फ केटल संस्थेच्या सहकार्याने केशर आंब्याची लागवड करून त्याचे योग्य संगोपन केले जात आहे. (Plantation of 5 thousand saffron mango plants in 1 year In Bhavani area nashik news)

डॉर्फ कॅटल मंगो कप स्पर्धेत ग्रामपंचायतीने भाग घेतला आहे. लोकसहभागातून लागवड केलेल्या रोपांच्या संगोपनासाठी ग्रामपंचायतीने रोजगार हमी योजनेतून मजुरांची नेमणूक केली आहे.

झाडांना पाणी देण्याबरोबरच त्यांच्या संगोपनाची जबाबदारी कर्मचारी नियमितपणे पार पाडत आहेत. ग्रामपंचायतीने यापूर्वी अमरधामसह रस्त्याच्या दुतर्फा पाच हजार झाडांची लागवड केली आहे. ऑक्सिजन झोन, नक्षत्र वनही बहरले आहे. त्यामुळे येथील वृक्षसंपदा आणि संगोपनाची माहिती घेण्यासाठी निसर्गप्रेमींच्या गावात नेहमी भेटी सुरू असतात.

पाण्यासाठी बांधणार शेततळे

भविष्यात झाडांना पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी सीएसआर फंडातून शेततळे उभारण्यासाठी ग्रामपंचायतीचे प्रयत्न सुरू आहेत.

"नवदृष्टी सप्रेम व डॉर्फ केटल कंपनीकडून भोकणी ग्रामपंचायतीला ५ हजार केशर आंब्याची रोपे मिळाली. त्यातील १५०० रोपांची ग्रामपंचायतीने लागवड केली. गावात ४०० कुटुंबांतील प्रत्येक सदस्याएवढी आंब्याची रोपे त्यांना संगोपनासाठी देण्यात आली. गावात साडेतीन हजार रोपांची लागवड करून त्याचे संगोपन केले जात आहे. या झाडांचे योग्य संगोपन करणाऱ्या कुटुंबांना ग्रामपंचायतीतर्फे रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे." -योगेश राहाणे, ग्रामसेवक

Amrai blooming in the area.
Nashik News: चांदवडला बेवारस अवस्थेत गायीचं वासरू थंडीने तडफडतय; नगरपरिषदेचे दुर्लक्ष

"गावात उभारलेले नक्षत्रवन, ऑक्सिजन झोन, रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे आणि आता नव्याने उभारलेली आमराईमुळे भोकणी गावाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. उत्पन्नाचे नगण्य स्रोत असलेल्या ग्रामपंचायतीला आमराईच्या माध्यमातून हक्काचे उत्पन्न मिळण्यास मदत होईल. ग्रामविकास मंच आणि ग्रामस्थांचे पर्यावरण संतुलनासाठी मोलाचे सहकार्य लाभत आहे." -अरुण वाघ, सरपंच, भोकणी

रोपवाटिका अन्‌ गांडूळ खत प्रकल्प

रोपवाटिका अन् गांडूळ खत प्रकल्प हरितग्रामची संकल्पना सत्यात उतरविणाऱ्या सरपंच अरुण वाघ यांनी केवळ वृक्षारोपण करून न थांबता त्यांची संगोपनाची व्यवस्था केली. गेल्या १२ वर्षांपासून सुरू असलेली वृक्षसाधना अद्याप सुरूच आहे. त्याचा प्रत्यय गावातील मोठमोठी झाडे बघितल्यावर आल्याशिवाय राहत नाही.

स्मशानभूमी परिसरात उभारलेल्या ऑक्सिजन झोनच्या परिसरातच रोपवाटिका तयार केली असून, रोपवाटिकेत विविध रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. रोपवाटिकेला जुन्या कौलांनी सजविले असून, त्याच्याजवळच गांडूळ खत प्रकल्प उभारून रोपांच्या पोषणाची व्यवस्था केली आहे.

Amrai blooming in the area.
Nashik News: गिरणार पर्वताचा देखावा आजपासून भाविकांसाठी खुला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com