PM Modi Nashik Visit: अयोध्याबरोबरच वाढले श्री काळारामाचे महत्त्व! मोदींच्या दौऱ्याचे फलित; भाविकांच्या संख्येत वाढ

गेल्या काही दिवसांपासून श्री काळारामास भेट देणाऱ्यांच्या संख्येत चारपट वाढ झाल्याचे दिसून येते.
PM Modi Nashik Visit: अयोध्याबरोबरच वाढले श्री काळारामाचे महत्त्व! मोदींच्या दौऱ्याचे फलित; भाविकांच्या संख्येत वाढ
esakal

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्री काळाराम मंदिरास भेट व त्यानंतर अयोध्येतील श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर अयोध्येपासून दीड हजार किलोमीटरवर असलेल्या नाशिकच्या श्री काळारामाचे महत्त्व दूरवर पोचले आहे.

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून श्री काळारामास भेट देणाऱ्यांच्या संख्येत चारपट वाढ झाल्याचे दिसून येते. (PM Nashik Visit importance of Shri Kalaram increased with Ayodhya Results of Modi visit Increase in number of devotees Nashik)

देशाचे पंतप्रधान नाशिकच्या श्री काळारामाच्या दर्शनासाठी येणार म्हटल्यावर मंदिर परिसरातील चिंचोळी जागा, छोट्या गल्ल्या यामुळे पंतप्रधानांचा हा दौरा होणार का, याबाबत अनेकांच्या मनात साशंकता होती.

परंतु विश्‍वस्त मंडळाने दिलेली सुरक्षेची हमी व अन्य बाबी अनुकूल घडल्यावर पंतप्रधान कार्यालयानेही यासाठी होकार कळविला. तेव्हापासून नाशिकच्या श्री काळारामाचे देशातच नव्हे तर थेट विदेशातही ब्रॅंडिंग झाले आहे.

त्यामुळे एरवी सहा सातनंतर मंदिर परिसरात दिसणाऱ्या तुरळक भाविकांच्या जागी आता मोठी गर्दी दिसू लागली आहे. अर्थात यासाठी विश्‍वस्त मंडळाचे नियोजनही दुर्लक्षित करून चालणार नाही.

जुन्या व अनुभवी विश्‍वस्तांबरोबरच रामानामाचा ध्यास घेतलेल्या नव्या विश्‍वस्तांनी या काळात राम मंदिरातील सेवेत अधिक काळ व्यतीत केल्याने सर्व कामे सोपी झाल्याचे विश्‍वस्त सांगतात.

गेले चार दिवस तर मंदिरात मध्यरात्रीपर्यंत गर्दी होती. यावरून नाशिकच्या श्री काळारामाचेही महत्त्व वाढल्याचे दिसून येते. सुरक्षेसाठी फक्त पूर्व दरवाजानेच प्रवेश व बाहेर पडण्याचा मार्ग निश्‍चित करण्यात आला होता.

उत्तर व दक्षिण दरवाजाजवळ राहणाऱ्या काही ज्येष्ठ भाविकांची या काळात थोडीफार अडचण झाली, परंतु मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्‍यकच असल्याचे विश्‍वस्त मंडळासह पंचवटी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी सांगितले.

PM Modi Nashik Visit: अयोध्याबरोबरच वाढले श्री काळारामाचे महत्त्व! मोदींच्या दौऱ्याचे फलित; भाविकांच्या संख्येत वाढ
Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रश्नावली भरताना होणार कसरत! अचूक मांडण्याचे प्रगणक, पर्यवेक्षकांसमोर आव्हान

प्रसादालय उभारण्याचा मानस

भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने सहाजिकच देवस्थानच्या उत्पन्नातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. वाढीव उत्पन्न व देणगीदारांच्या आश्रयावर भविष्यात भक्त निवासासह भव्य प्रसादालय उभारण्याचा मानस असल्याचे विश्‍वस्तांनी सांगितले.

यासाठी देवस्थानच्या मालकीच्या जागांचा वापर करण्यात येणार आहे. सध्या अनेक जागांचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने विश्‍वस्त मंडळही अंतिम निकालाच्या प्रतिक्षेत आहे.

देवस्थानचे प्रमुख हे जिल्हा सत्र न्यायाधीश असल्याने यावर सकारात्मक तोडगा निघाल्यास देवस्थानच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचे ठरेल, असे एका विश्‍वस्ताने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

रक्तदान शिबिरातून ८३ बाटल्या संकलन

अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नाशिकच्या श्री काळाराम मंदिर संस्थानतर्फे अनेक उपक्रम राबविण्यात आले. जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या रक्तदान शिबिरातून तीन दिवसांत ८३ बाटल्या रक्ताचे संकलन करण्यात आले.

एकमेव मंदिर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंत्र्यांनी श्री काळारामाचे दर्शन घेतले. याशिवाय ठाकरे परिवारातील माजी मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सहकुटुंब दर्शन घेतले.

पंतप्रधानांपासून राज्याचे मुख्यमंत्री, अनेक मंत्री यांनी काही दिवसांच्या अंतराच भेट दिलेले श्री काळाराम हे एकमेव मंदिर आहे.

PM Modi Nashik Visit: अयोध्याबरोबरच वाढले श्री काळारामाचे महत्त्व! मोदींच्या दौऱ्याचे फलित; भाविकांच्या संख्येत वाढ
Nashik Lok Sabha Election : मतदारांत 4 लाख 87 हजारांनी वाढ! अंतिम मतदार यादी जाहीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com