Nashik Congress News: अद्यापही नैराश्यात अडकलेला पक्ष...

शहराध्यक्षाचे स्वागत प्रतिकॉँग्रेस पक्ष व शहराध्यक्ष नेमून करण्यात आल्याने गटबाजी काँग्रेसचे समर्थन करण्याच्या मानसिकतेत असलेले सर्वसामान्य नागरिकही विचारापासून फिरल्याचे दिसले...
akash chhajed & Tushar shevale of nashik congress
akash chhajed & Tushar shevale of nashik congressesakal

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

पराभवाची मानसिकता असलेला काँग्रेस पक्ष अद्यापही अशा प्रकारच्या मानसिकतेतून बाहेर येत नाही. हे सरत्या वर्षातदेखील पदोपदी दिसून आले. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची उडालेली शकले.

यातून दोन्ही पक्षअंतर्गत यादवीला तोंड देत असताना विरोधकांची मोठी पोकळी भरून काढण्याची संधी काँग्रेसने गमावली, असेच म्हणावे लागेल. वर्षभरात जयंती, पुण्यतिथी पलिकडे पक्ष गेला नाही.

ड्रग्ज विरोधातील आंदोलन वगळता ठोस असे आंदोलन झाले नाही. सणासुदीला शुभेच्छांचा तो ही एकच बॅनर फडकावून जिवंतपणा दाखविण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यावरही पारंपरिक पद्धतीचा अर्थात घराणेशाहीचा बाज दिसून आला.

अंतर्गत गटबाजी, वाताहताचे शाप घेऊन पक्ष पुढील वर्षात प्रवेश करत आहे. काँग्रेसला प्रभारी शहराध्यक्ष मिळाला एवढेच काय तो बदल, परंतु त्या बदलाचा परिणाम वर्षभरात दिसला नाही. (Nashik Congress Party condition still stuck in depression maharashtra politics news)

राष्ट्रवादी शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांचा फायदा उचलण्याइतपतदेखील ताकद काँग्रेसमध्ये राहिलेली नाही. मागील काही वर्षांपासूनचे नैराश्य अजूनही दूर गेलेले नाही. या वर्षी पक्षाची मरगळ झटकण्याची संधी होती, परंतु गटबाजीने ती हिरावली.

प्रभारी का होईना शहराध्यक्ष मिळाल्यानंतर काही तरी नवीन झाले असे वाटत असतानाच शहराध्यक्षाचे स्वागत प्रतिकॉँग्रेस पक्ष व शहराध्यक्ष नेमून करण्यात आल्याने गटबाजी काँग्रेसचे समर्थन करण्याच्या मानसिकतेत असलेले सर्वसामान्य नागरिकही विचारापासून फिरल्याचे दिसले.

कार्यकर्त्यांना पक्षाचा कार्यक्रम नसल्याने पक्षाला लागलेली ओहोटी कायम आहे. पक्षात वर्षभरात नवीन प्रवेश झाले नाही, जे झाले ते अनोळखी चेहरे आहे. पक्षात नवचैतन्य आल्याचे दाखविण्यासाठी तो खटाटोप दिसून आला.

महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी साजरी झाली, परंतु त्यात उस्फूर्त भाषणे झाली नाही. तेच तेच चेहरे फोटोभोवती रिंगण करून उभे राहिल्याचे दिसले. शहरअंतर्गत असलेल्या गटबाजी दिल्लीपर्यंत पोचूनही ती दूर झाल्याचे दिसले नाही.

नेतेमंडळी आल्यावर पक्षाच्या व्यासपीठांवर गर्दी दिसत असली तरी प्रेक्षकांमध्ये फोटोग्राफरला फोटो काढण्याची संधी मिळेल एवढीदेखील गर्दी दिसली नाही. बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते टाळ्या वाजविण्यापुरते दिसून आले.

akash chhajed & Tushar shevale of nashik congress
Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुढे काय होईल? भाजप-RSS बैठकीबद्दल जितेंद्र आव्हाडांचा 'एक्स'वर मोठा गौप्यस्फोट

राजस्थानातील चिंतन शिबिरात ठरल्यानुसार एक व्यक्ती एक पद हे सूत्र ठरले खरे, परंतु प्रदेश उपाध्यक्ष नियुक्ती झालेले शरद आहेर यांच्या रिक्तपदी शहराध्यक्षपदाची धुरा सांभाळलेले आकाश छाजेड यांची पुन्हा प्रभारीपदाची धुरा सोपविल्याने पक्षाचे आदेश फक्त भाषणापुरतेच दिसून आले.

शहरात सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्‍न आ वासून उभे असताना त्यावर आंदोलन झाले नाही. जे झाले ते फोटोसेशन पुरते. ड्रग्ज प्रकरणी शहर काँग्रेसने सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. मात्र, ही भूमिकाही अल्पजीवी ठरली.

प्रभारी शहराध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी कार्यकारिणी जाहीर झाली. यातही जुने चेहरे दिसले. जिल्ह्यातही फार काही नवीन झाले असे नाही. कोणत्याही तालुक्यात पक्षाचे संघटन राहिलेले नाही.

कार्यकर्ते नाही. ठराविक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या बैठका झाल्या. ग्रामीण भागात काम करण्यासाठी ग्रामीण चेहरे संघटनेत देणे अपेक्षित असताना तेदेखील दिले गेले नाही. शहरातील नेत्यांवर जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्याची नामुष्की जिल्हा काँग्रेसवर आली आहे.

२०१९ पासून जिल्हाध्यक्षपदाची धुरा तुषार शेवाळे सांभाळत आहे. परंतु, त्यांच्याकडून पक्षाला फायदा झाला नाही. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विभागीय बैठक घेत पदाधिकाऱ्यांना चार्ज करण्याचा प्रयत्न केला.

परंतु, पटोले यांनी पाठ फिरविताच जैसे-थे परिस्थिती झाली. एकंदरीत नवीन वर्षात पदार्पण करताना काँग्रेसला अजून बरेच मैदान मारावे लागेल, असे सध्या तरी दिसते.

akash chhajed & Tushar shevale of nashik congress
Nashik Political: दोघा माजी नगरसेवकांना पोलीस सुरक्षा! मंत्रालयातून ‘फिल्डींग’; पोलीस संशयाच्या भोवऱ्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com