esakal | विवाहितांचे नकळत अश्लील व्हिडिओ काढणारा अखेर पोलिसांच्या ताब्यात; नाशिकमधील प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

crime

विवाहित महिलांचे अश्लील चित्रीकरण करणारा पोलिसांच्या ताब्यात

sakal_logo
By
युनूस शेख

नाशिक : विवाहिता अंघोळ करीत असताना बाथरूमच्या तुटलेल्या खिडकीतून मोबाइलच्या माध्यमातून अश्लील छायाचित्रण करण्यात येत असल्याचा प्रकार रविवारी (ता.१८) दुपारी जुने नाशिक परिसरात उघडकीस आला. घटनेची माहिती समजताच परिसरात तणाव निर्माण झाला होता. भद्रकाली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत संशयिताला ताब्यात घेतल्याने अनुचित प्रकार टळला. (Police-arrested-suspected-shooting-married-woman-marathi-news-jpd93)

विवाहिता अंघोळ करतानाचे छायाचित्रण केल्याने तणाव

संबंधित विवाहितांच्या शेजारी राहत असलेल्या इम्रान इकबालअहमद भुसारी (वय.३५) याने त्याच्या मोबाईलमध्ये विवाहिता आंघोळीस बसत असताना बाथरूमच्या तुटलेल्या खिडकीतून छायाचित्रण करीत असल्याचे तिच्या लक्षात येताच तिने आरडाओरड केली. संशयितांनी खिडकीतून मोबाईल मागे घेत पळ काढला. घडलेला प्रकार विवाहितेने कुटुंबीयांना सांगितला. त्यांनी त्या संशयितांच्या मोबाईलची तपासणी केली असता ते चित्रीकरण डिलीट केल्याचे लक्षात आले. कुटुंबीयांनी मोबाईलमधील रिसायकलबिनची तपासणी केली. त्यात छायाचित्रण केलेले व्हिडिओ दिसून आले. त्यात तक्रारदार विवाहितेचा व्हिडिओ असल्याचे दिसले. इतर व्हिडिओ तपासणी केली असता. त्यात तक्रारदार विवाहितेच्या कुटुंबीयांतील अन्य विवाहितेची अशाप्रकारे छायाचित्रण केल्याचा व्हिडिओ मिळून आला. कुटुंबीयांनी भद्रकाली पोलिसांशी संपर्क साधत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत घटनास्थळी धाव घेत पीडित विवाहितेच्या कुटुंबीयांची समजूत काढून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये अशी विनंती केली. त्यानंतर संशयितास त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. संशयिताच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ असल्याने पोलिसांनी चौकशीसाठी मोबाईल जप्त केला. भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: राज्याचे लक्ष लागलेला 'तो' विवाह सोहळा अखेर रद्द!

हेही वाचा: विकेंडला नाशिककरांची त्र्यंबकेश्वर, अंबोली घाटात मांदियाळी

loading image