esakal | सिनेस्टाइल थरार! जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी जेरबंद; पोलीस पथकाला २५ हजार रुपये बक्षीस जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

yeola accused.jpg

सुनावणीनंतर नागपूरला पोलिस रेल्वेने घेऊन जात असताना भुसावळ रेल्वे स्टेशन येथून तो पोलिसांच्या ताब्यातून पळाला होता. तेव्हापासून तो फरारी होता. आता तालुक्यातील चोरीच्या तपासात त्याला पकडल्यानंतर त्याचा इतिहास पुढे आला आहे.

सिनेस्टाइल थरार! जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी जेरबंद; पोलीस पथकाला २५ हजार रुपये बक्षीस जाहीर

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला/म्हसरूळ (जि.नाशिक) : तालुक्यातील खरवंडी, रहाडी येथे एकाच रात्रीत आठ ते नऊ ठिकाणी घरफोड्या व चोऱ्‍या करणाऱ्‍या आरोपीला तालुका पोलिसांनी सिनेस्टाइल जेरबंद केले. विशेष म्हणजे हा आरोपी दिवे आगर (जि. रायगड) येथील गणेश मंदिर दरोडा व लूटमार प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आणि रेल्वेतून पोलिसांच्या हातून दोन वर्षांपूर्वी फरारी झालेला आरोपी आहे. 

जन्मठेपेतील आरोपी सिनेस्टाइल जेरबंद 

एकाच रात्रीत विक्रमी घरफोड्या झाल्याने पोलिसांपुढे तपासाचे आव्हान उभे राहिले होते. पोलिस अधीक्षक सचिन पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंग साळवे यांच्या सूचनांवरून सहाय्यक निरीक्षक उज्ज्वलसिंग राजपूत व एकनाथ भिसे यांनी पथके तयार करून तपास सुरू केला होता. या तपासादरम्यान येवला व वैजापूर तालुक्‍यांच्या सीमेवर असलेले बिलावणी (ता. वैजापूर) येथे एकजण काही दिवसांपासून संशयितरीत्या वावरत असल्याची व गुन्हेगार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार भिसे, राजपूत, हवालदार सानप, सतीश मोरे, आबा पिसाळ, मुकेश निकम यांनी सलग दोन दिवस भारम परिसरामध्ये सापळा लावत या आरोपीला फिल्मी स्टाइलमध्ये ताब्यात घेतले होते. त्या वेळी त्याने झटापट करत राजपूत, सानप व मोरे यांना चावाही घेतला. मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्या वेळी त्याने शिवा जनार्दन काळे (रा. बिलोणी) असे खोटे नाव सांगितले.

अनेक जिल्ह्यांमध्ये त्याचा शोध सुरू होता. 

पोलिसांनी त्याच्या घरातून कटावणी, पकड, स्क्रूड्रायव्हर, टॉर्चलाइट, चॉपर, चाकू असे घरफोडीचे साहित्यही जप्त केले. तपासात हा आरोपी २०१२ मध्ये दिवे आगार गणेश मंदिर (जि. रायगड) येथील दरोडा व दोन सुरक्षारक्षकांच्या खुनातील आणि गणेशमूर्तीच्या सोन्याचा मुखवटा चोरल्याच्या प्रकरणातील प्रमुख आरोपी होता. त्या वेळी त्याला अटक करण्यात येऊन त्याच्यासह १२ आरोपींना विशेष मोक्का न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. त्यांपैकी हा आरोपी सतीश ऊर्फ सत्त्या जैनू काळे यालाही न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तो नागपूर कारागृहात शिक्षा भोगत असताना २०१८ मध्ये सुनावणीसाठी निफाड सत्र न्यायालयात त्याला आणले होते. सुनावणीनंतर नागपूरला पोलिस रेल्वेने घेऊन जात असताना भुसावळ रेल्वे स्टेशन येथून तो पोलिसांच्या ताब्यातून पळाला होता. तेव्हापासून तो फरारी होता. आता तालुक्यातील चोरीच्या तपासात त्याला पकडल्यानंतर त्याचा इतिहास पुढे आला आहे. या आरोपीवर यापूर्वी घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, खून असे अनेक गुन्हे असून, तो प्रचंड घातक व नंगट स्वरूपाचा असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये त्याचा शोध सुरू होता. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

२५ हजार रुपयांचे बक्षीस
दरम्यान, सोमवारी (ता. २६) झालेल्या पत्रकार परिषदेत दोन दिवस प्रचंड मेहनत घेत जन्मठेपेची शिक्षा आणि मोक्का लावलेल्या आरोपीला पकडल्याने पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी सहाय्यक निरीक्षक एकनाथ भिसे, उज्ज्वलसिंह राजपूत, आबा मिसाळ, मुकेश निकम, सानप, मोरे यांच्या पथकाला २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. 

हेही वाचा > पतीनेच चोरीचा बनाव करत गरोदर पत्नीला संपविले; सासऱ्याची जावयाविरुध्द तक्रार


अट्टल गुन्हेगाराविरुद्ध २८ गुन्हे 
मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी-चिंचवड, शिक्रापूरसह विविध शहरांतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, खुनासहित दरोड्याचे २८ गुन्हे दाखल असून, यातील सहा गुन्ह्यांमध्ये निर्घृण हत्या करून लूट अशा स्वरूपाचे आहेत. अनेक जिल्ह्यांतील पोलिस त्याचा शोध घेत होते. 

loading image