IPS गंगा किनारेवाला! गंगेवरील प्रेमापोटी नाशिक पोलीस आयुक्तांचा 'तो' उपक्रम चर्चेचा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

deepak pandey

IPS गंगा किनारेवाला! गंगेवरील प्रेमापोटी 'तो' उपक्रम चर्चेचा

नाशिक : एका बाजूला नदी प्रदूषणाचे हे विदारक चित्र असताना दुसरीकडे, मात्र देशातील आयपीएस (IPS) दर्जाच्या अधिकारीकडून निखळ गंगेवरील प्रेमापायी तब्बल आठ महिन्यापासून भल्या पहाटे 'हा' उपक्रम सुरू आहे. नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे (cp deepak pandey) यांचा उपक्रम अनेकांसाठी अनुकरणीय ठरला आहे.

पांडेजी आप तो कमाल करते हो! अनादी काळापासून गोदावरीवर प्रेम

एका बाजूला नदी प्रदूषणाचे हे विदारक चित्र असताना दुसरीकडे, मात्र देशातील आयपीएस दर्जाचा आधिकारी निखळ गंगेवरील प्रेमापायी तब्बल आठ महिन्यापासून भल्या पहाटे गोदावरी स्नानाने दिवसाची सुरवात करतात. सुर्योदय पूर्वीच्या गंगास्नानातून स्वतातील उर्जा प्रज्वलित करणारे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांचा उपक्रम अनेकांसाठी अनुकरणीय ठरला आहे. त्यांच्या गंगा स्नानापासून प्रेरणा घेत अनेक परिसरातील भाविक आणि लहान मूलही स्नानाला येऊ लागली आहे. अनादी काळापासून गोदावरीवर प्रेम करणाऱ्याच्या यादीत दस्तुरखुद्द देशातील गंगेच्या काठच्या आयपीएस आधिकारी पांडे यांच्या उपक्रम गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी हे आश्वासक ठरणारा आहे.

हेही वाचा: पुढील 3 महिने पोलीसांची कसोटी! साप्ताहिक सुट्यांवरही फुली

वडीलांची त्यामागे प्रेरणा

पोलिस आयुक्त पदाची सूत्र स्विकारल्यापासून श्री पांडे नित्यनेमाने गोदावरी नदीवर पहाटे स्नानाला येतात. त्यांचे वडील दीपक पांडे यांच्या प्राकृतीक चिकित्सेवर आधारीत नैसर्गिक वातावरणाशी समरस होउन त्यातून उर्जा घेत रोज नव्या जोमाने कामाला सुरुवात करतात. पहाटे त्यांचा दिवस सुरु होतो. गोवर्धन - महादेवपूर शिवारातून वाहणाऱ्या गोदावरी तिरावर ते स्नानाला येतात. गोदावरीत स्नानानंतर पाण्यात पोहण्याचा व्यायाम त्यानंतर सुर्याला अर्ध्य देतांना कोवळी किरण अंगावर घेतल्यानंतर प्राणायाम अनुलोम-विलोम केल्यानंतर नव्या दमाने कामाला सुरुवात करतात. पूर, थंडी, वारा अशा सगळ्या वातावरण न चुकता गोदावरी स्नान करणाऱ्या दीपक पांडे यांचे त्यामागे एक तत्वज्ञान आहे. त्यांच्या वडीलांची त्यामागे प्रेरणा आहे.

तर गोदावरीला पुर्नवैभव

कोणत्याही शहराची ओळख तेथील नदीच्या स्वच्छतेवर अवलंबून आहे. गोदावरी नदी ही हिमालयापेक्षा प्राचिन असून, गत अवघ्या ५० ते ६०० वर्षात या नदीचे वैभव हरपले आहे. लाखो वर्षापासून वाहणाऱ्या नदीत अलिकडे पन्नास साठ वर्षापासून मलनिस्सारण (सांडपाणी-औद्योगिक मल) गटारीकरणाद्वारे नदीत सोडण्यास सुरुवात झाल्यापासून नद्यांचे प्रदूषण सुरु झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उच्चाधिकार समिती स्थापन झाली असून त्यात पोलिसांवर आंघोळी रोखणे, निर्माल्य फेकणाऱ्यांना रोखणे एवढी जुजबी कर्तव्य निश्चित करण्यात आले आहेत. वास्तविक, पोलिसांची भुमिका यापेक्षा वेगळी व मोठी असून, याबाबत राज्य सरकार वा पोलिस महासंचालकांनी आदेश देत, पोलिसांकडे नदी स्वच्छतेच्या नियोजनाचे काम दिल्यास गोदावरीचे गत पुर्नवैभव प्राप्त होउ शकेल. अस पोलिस आयुक्त दीपक पांडे यांचे म्हणण आहे. आयपीएस पांडे यांचे गोदावरी प्रेम हे निश्चितीत निर्मल विरल गोदावरीसाठी आश्वासक वाटते.

गोदावरी स्नान ही एक प्राकृतीक चिकित्सा

जीवसृष्ट्रीसह तमाम मानवी जीवणाला पंचमहाभूतांचे , त्याच्या तत्वज्ञानाचे अधिष्ठान आहे. प्रत्येकाच्या जीवणावर पंचमहाभूताचा प्रभाव आहे. हे एक शास्त्र आहे. त्यामुळे या तत्वावर आधारीत गंगास्नानाचे महत्व मानवी आरोग्याच्या दृष्ट्रीने मोठे महत्व आहे. गोदावरी स्नान ही एक प्राकृतीक चिकित्सा आहे. जलस्नान, प्राणायाम, सुर्य किरणांचे स्नान, जमीनीच्या गुरुत्वाकर्षणाचे (ॲक्युप्रेशर) आदीचे महत्व आहे. माझे वडील शिवानंदजी पांडे यांच्याकडून मी हे सगळे शिकतो आहे. -दीपक पांडे (पोलिस आयुक्त नाशिक)

हेही वाचा: नाशिक : दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे धक्के; ग्रामस्थांत भिती

Web Title: Police Commissioner Deepak Pandey Activity For Ganga River

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top