Midnight Culture : नाशिकमध्ये मिडनाईट कल्चर; मध्यरात्रीपर्यंत खाद्यपदार्थ, हॉटेल्स राहणार सुरू!

midnight culture
midnight cultureesakal

नाशिक : साधारणत: शहरात रात्री दहाच्या ठोक्याला चौकाचौकात पोलिस गाड्यांवरून सूचना देत आस्थापना बंद केल्या जात. मात्र, पोलिस आयुक्तालयाने याबाबत नव्याने आदेश लागू केले असून, त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत हॉटेल्स, अन् बिअरबार सुरू राहू शकतील. तर, खाद्यपदार्थ, मद्यविक्री दुकानांना रात्री साडेअकरापर्यंत खुले ठेवण्याची परवानगी असेल. (Police Commissionerate has implemented new order of midnight culture nashik news)

तसे आदेश आयुक्तालयाच्या वतीने संबंधित पोलिस ठाणे व शाखांना देण्यात आले आहेत.
एरवी, शहरात रात्री दहानंतर साऱ्याच आस्थापना बंद करण्यात येत. पोलिसांकडून सूचना देत दुकाने बंद केली जात. वेळप्रसंगी पोलिसांकडून कारवाईही केली जात असे. मात्र, शासनाच्या आदेशानुसार पोलिस आयुक्तालयाने रात्री आस्थापना सुरू ठेवण्यासंदर्भातील नव्याने आदेश जारी केले आहेत.

त्यानुसार, शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये खाद्यपदार्थांची दुकाने, देशी- विदेशी मद्यविक्री दुकानांना रात्री साडेअकरापर्यंत खुले ठेवण्याची परवानगी आहे. तर, हॉटेल्सला मध्यरात्री साडेबारा वाजेपर्यंत आणि परमीट बिअरबार सुरू ठेवण्यास मध्यरात्री दीड वाजेपर्यंतची परवानगी आहे. देशी मद्याच्या विक्रीसाठी मात्र सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंतच परवानगी असेल.

तर, सिमेमागृहांना रात्री एक वाजेपर्यंतची परवानगी पोलिस आयुक्तालयातर्फे देण्यात आलेली आहे. परंतु हे सारे व्यावसायिक परवानाधारकांसाठी, विनापरवानाधारक व्यावसायिकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जाईल. या निर्देशांबाबत आयुक्तालय हद्दीतल्या सर्व पथकांना सूचित करण्यात आले आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

midnight culture
Nashik News : श्री कपालेश्‍वर महादेव मंदिर जीर्णोद्धाराचे काम प्रगतिपथावर

हे बदल नव्याने झाले नसून, २०१६ मध्ये निघालेल्या शासन आदेशानुसार कार्यालयीन कामकाजासाठी सर्व पथकांना कळविले आहेत. शासन आदेशात नमूद वेळेनुसारच आस्थापना बंद होणे अपेक्षित असून, त्यानुसारच संबंधितांवर कारवाई करावी, असे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.

यासाठी परवान्याची आवश्‍यकता नाही पण....
नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत सार्वजनिक मनोरंजनाच्या जागांसाठी, कॅब्रे नृत्याचे कार्यक्रम, डेस्कोथेक, खेळमेळे व तमाशे यांसारख्या कार्यक्रमांना पोलिस आयुक्तालय कार्यालयाच्या परवान्याची आवश्यकता नाही. मात्र स्थानिक पोलिस ठाण्याकडे त्यासंदर्भात कळविणे बंधनकारक असेल. मात्र, बंदीस्तऐवजी खुल्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांसाठी पोलिसांची पूर्वपरवानगी बंधनकारक राहणार आहे.

नव्याने आस्थापनांच्या वेळा (शहर)
- रात्री १० वाजेपर्यंत : देशी मद्यविक्री
- रात्री ११.३० वाजेपर्यंत : खाद्यपदार्थ व मद्यविक्री दुकाने
- मध्यरात्री १२.३० वाजेपर्यंत : हॉटेल्स
- मध्यरात्री १.३० वाजेपर्यंत : परमीट रूम, बिअरबार, डिस्कोथेक
- मध्यरात्री १.०० वाजेपर्यंत : थिएटर्स, सिनेमा प्रदर्शन गृहे

midnight culture
Winter Temperature : भौगोलिक रचनेमुळे द्राक्षपंढरी नेहमीच गारठलेली! हवेची घनताही जास्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com