Nashik Crime: पोलिस, एफडीएचे शहरात प्रतिबंधित गुटख्याविरोधात कारवाई; 32 हजारांचा गुटखा जप्त

Gutkha file photo
Gutkha file photoEsakal

नाशिक : शहर-जिल्ह्यात अवैधरित्या विक्री होत असलेल्या प्रतिबंधित गुटख्याविरोधात पोलिसांकडून कठोरपणे कारवाई केली जात असतानाही या प्रतिबंधित गुटख्यांची चोरी छुप्यारितीने विक्री सुरू आहे.

आयुक्तालय हद्दीमध्ये पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) मदतीने तीन ठिकाणी छापेमारी करीत सुमारे ३२ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करीत दोघांना अटक केली आहे. (Police FDA action against banned gutka in city Gutkha worth 32 thousand seized Nashik Crime)

आयुक्तालयातील नाशिकरोड, गंगापूर आणि सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हददीमध्ये पोलिसांनी छापेमारी करीत चोरीछुप्या विक्री होत असलेला प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. यात सर्वाधिक साठा गंगापूर हद्दीतील कॉलेजरोड परिसरातून जप्त केला आहे.

यशवंत सोसायटीतील शॉप नं. २ येथे प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याचा साठा करून विक्री केली जात होती.

याची खबर मिळताच गंगापूर पोलिसांनी एफडीएच्या मदतीने सदरील ठिकाणी बुधवारी (ता.२२) दुपारी चार वाजता छापा टाकला असता, त्याठिकाणाहून १९ हजार ६७५ रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटखा पानमसाल्याचे पाकिटे असा साठा जप्त करण्यात आला.

संशयित पंकज हेमंत सबलानी (३३, रा. महालक्ष्मी सोसायटी, काठेगल्ली, द्वारका), मेहबूब अली राज्जब अली (२७, मूळ रा. बहरैच, उत्तरप्रदेश) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gutkha file photo
Crime News : बिल काढण्यासाठी घेतली लाच; महिला सरपंचाला पतीसह अटक

सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कॉलेज रोडवरील गोदावरी कॉलनीत असलेल्या मातोश्री पान स्टॉल याठिकाणी प्रतिबंधित गुटख्याची विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पथकाने याठिकाणाहून ३ हजार ७९६ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला.

याप्रकरणी संशयित विशाल सदाशिव वराडे (वय २९) यास अटक करण्यात आली आहे. तिसरी कारवाई एकलहरे रोडवरील बैठक पान स्टॉलवर करण्यात आली.

नाशिकरोड पोलिसांनी बुधवारी (ता.२२) सकाळी साडेअकराच्या सुमारास छापा टाकून ९ हजार १०६ रुपयांचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला. याप्रकरणी संशयित गजानन साहेबराव थोरात (३९, रा. एकलहरे रोड) यास अटक करण्यात आली आहे.

Gutkha file photo
Nashik Crime: सिडको मनपा अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटीतंर्गत गुन्हा; खासगी व्यक्ती सह, तोतया पोलिसाचा देखील समावेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com