police nashik 123.jpg
police nashik 123.jpg

गौरवास्पद! महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिकच्या 31 जणांना पोलिस पदक जाहीर!

नाशिक : महाराष्ट्र पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त "पोलिस महासंचालक' पदक जाहीर झाले आहेत. नाशिक ग्रामीणमधील मनमाड उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंग साळवे, नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक दिनकर पिंगळे, नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, पोलिस आयुक्तालयातील पोलिस निरीक्षक प्रभाकर घाडगे, शहर मध्यवर्ती गुन्हेशाखेचे पोलिस उपनिरीक्षक भीमराव गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील विविध शाखांमधील 31 पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. 

 साळवे, पिंगळे, वाघ यांच्यासह 31 जणांना पोलिस पदक 
पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला 2019 साठी राज्यातील 800 पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस महासंचालक पदक जाहीर केले. पोलिस दलात मानाचे असलेल्या या पदकांमध्ये नाशिक शहर व जिल्ह्यातील 31 पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यात, पोलिस आयुक्तालयातील 16, नाशिक ग्रामीण पोलिस दलातील नऊ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह महाराष्ट्र पोलिस अकादमीतील तीन, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील एक, दहशतवादविरोधी पथकातील तीन अशा 31 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

यांचा होणार सन्मान 
* नाशिक शहर : पोलिस निरीक्षक आनंदा वाघ (गुन्हे-उकल), उपअधीक्षक दिनकर पिंगळे (लाचलुचपत प्रतिबंधक, नाशिक), पोलिस निरीक्षक प्रभाकर घाडगे (उत्तम सेवा), उपनिरीक्षक भीमराव गायकवाड, सहाय्यक उपनिरीक्षक नितीन चंद्रात्रे, अनिल भालेराव, भागीरथ हांडोरे, हवालदार विनोद पाटील, विष्णू उगले, सुरेश माळोदे, प्रभाकर कोल्हे, पोलिस नाईक मनीष धनवटे (डीटीएस नाशिक), शेख अलिम, शेख सलीम, पोलिस नाईक देवराम सुरंगे, साधना खैरनार (नागरी हक्‍क संरक्षण, नाशिक), भारत पाटील. 
* नाशिक ग्रामीण : उपअधीक्षक समीरसिंग द्वारकोजीराव साळवे (नक्षलविरोधी कारवाई), सहाय्यक उपनिरीक्षक सुनील आहिरे (उत्तम सेवा), जावेद इब्राहिम देशमुख, भाऊसाहेब ठाकरे, हवालदार दिलीप देशमुख, शांताराम नाठे, अण्णासाहेब रेवगडे, पोलिस नाईक तुषार पाटील, भारत कांदळकर. 
* महाराष्ट्र पोलिस अकादमी : राजेंद्र ठाकरे, हवालदार दिनेश सूर्यवंशी, सचिन अहिरराव. 
* दहशतवादविरोधी पथक (नाशिक) : महादेव वाघमोडे, हवालदार रफिक पठाण, पोलिस नाईक अनिल घुले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com