अचानक सायरनचा तो धडकी भरविणारा आवाज..नागरिकांत घबराट अन् सुटकेचा निश्वास! काय घडले नेमके?

mock drill vani.jpg
mock drill vani.jpg

नाशिक / वणी : दुपारची दोन वाजेची वेळ...बाजारपेठेत बऱ्यापैकी ग्राहकांची गर्दी असतांना अचानक पोलिस स्टेशनमधून पोलिस गाड्यांचा ताफा सायरन वाजवीत वणीतील मुख्य बाजारपेठेतून संताजी चौकाच्या दिशेने वेगाने झेपावला... नागरिकांत काहीशी भरलेली धडकी व घाबरलेल्या स्थिततचं कुठे काय झाले याबाबत एकमेकांना विचारण्याबरोबरचं... माहीती घेण्यासाठी एकमेकांना मोबाईलद्वारे संपर्क करण्यासाठी मोबाईलही खणखणू लागले...

कुठे लुट व दरोडा पडला की काय..?

कोणालाच कुठे काय झाले कोणालाच माहीती नाही, पण संताजी चौकात गाड्या थांबून पोलिस कुमक लाठ्या, बंदुकी, हेल्मेट आदीसंह रस्त्यावर उतरल्याच्या बातम्या पसरल्या.. याच भागात महाराष्ट्र बँकेसह, स्टेट बँक ऑफ इंडिया व महाराष्ट्र बँकेचे एटीएम, राजीव गांधी पतसंस्था व ज्वलरी पेढ्या असल्याने कुठे लुट व दरोडा पडला की काय..? नागरिकांत दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली. सकाळचे बातमीदारांसह काही पत्रकांरानी संताजी चौकात नेमके काय घडले याची चौकशी करण्यासाठी धाव घेतली.

अन् गावातील उलट सुलट चर्चांना पूर्णविराम

यावेळी पोलिस अधिकारी यांनी सांगितले की बाकी काही प्रकार नसून आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस संचलन होणार आहे. यानंतर ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेले कुतुहल व गावातील उलट सुलट चर्चांना हळूहळू पूर्ण विराम मिळाला. दरम्यान कळवण उप विभागिय पोलिस उप अधिक्षक सदाशिव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आगामी गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने पोलिस संचलन आयोजित करण्यात आले होते. या संचलनासाठी वणी पोलिस ठाण्यासह दिंडोरी, सुरगाणा, बाऱ्हे, अभोणा, देवळा, कळवण येथील पोलिस ठाण्यातील प्रत्येकी १ पोलिस अधिकारी व ५ कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचे जवान असे दहा पोलिस अधिकाऱ्यासंह पन्नास पोलिसांचे पथक येथील संताजी चौकात प्रत्येक पोलिस स्टेशनच्या पोलिस व्हॅनसह दाखल झाले होते. यावेळी पोलिस उपअधिक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाने  वणीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर शिंपी, पोलिस उप निरीक्षक योगेश शिंदे आदी अधिकाऱ्यांनी पोलिस संचलनाबाबत पोलिसांकडून लाठी, संरक्षक ढाल (जाळी), शस्त्रधारी पोलिस यांच्याकडून सराव करुन घेतला.

बघण्यासाठी गर्दीही झाली

यावेळी परीसरातील नागरिकांनी काहीशी मनात भिती बाळगत नेमके काय प्रकार सुरु आहे हे बघण्यासाठी गर्दीही झाली होती. दरम्यान सराव झाल्यानंतर संताजी चौक, भाजी मंडई, देवी मंदीर चौक, पांचाळ गल्ली, पिपंळगाव चौफुली मार्गे पोलिसांनी संचलन करीत पोलिस ठाण्याच्या आवारात संचलनाची सांगता झाली. मात्र पोलिस गाड्यांच्या सायरनच्या आवाजाने निनादलेली बाजारपेठ, पोलिसांची गावात दाखल झालेली मोठी कुमक याबाबत दिवसभर गावात चर्चा सुरु होती.

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com