अचानक पोलिस आले अन् नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला!

police mock drill in manmad
police mock drill in manmadesakal

मनमाड (जि. नाशिक) : दंगा नियंत्रक गाडीतून उतरलेले पोलिस... समोरून चालून आलेला जमाव... अश्रुधुराच्या उडालेल्या नळकांड्या, हवेत केलेली फायर, अग्निबंबातून उडालेले पाणी ही दृश्‍य पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. शहरात काही विपरीत घडल्याच्या भीतीने नागरिक काहीसे घाबरले होते. मात्र, सण-उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आम्ही संभाव्य प्रसंगाला सज्ज असल्याचे दाखवून देण्यासाठी मनमाड पोलिसांनी केलेले हे ‘मॉकड्रिल’ (‘Mock drill) असल्याचे कळताच नागरिकांचा जीव भांड्यात पडला.

गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांची प्रात्यक्षिके

आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस यंत्रणा व इतर यंत्रणा किती सतर्क आहेत, याची खात्री करण्यासाठी मनमाड पोलिसांच्या वतीने शिवाजी चौकात मॉकड्रिल घेण्यात आले. घटना घडल्यास पोलिस अधिकारी व कर्मचारी किती वेळात हजर होतात, इतर विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना येण्यास किती वेळ लागतो, अनुचित घटना घडल्यास त्यास कसा प्रतिबंध करता येईल, जमाव कसा पांगवता येईल, याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
मनमाड पालिकेचा अग्निबंब घेऊन कर्मचारीदेखील घटनास्थळी पोचले.

police mock drill in manmad
विनाहेल्मेट पेट्रोल भरणाऱ्यांना दणका; ७२ चालकांचे परवाने होणार रद्द

‘हमारी मांगे पुरी करो’चे लागले नारे

‘हमारी मांगे पुरी करो,’ अशा जोरदार घोषणाबाजी करत पुढे आलेला जमाव अनियंत्रित झाला. जमावाने आग लावली. पोलिसांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न सुरू केला. पोलिसांनी अडविल्यानंतर जमाव संतप्त झाला. जमावाला रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या भिरकावण्यात आल्या. हवेत फायर करण्यात आले. या धावपळीत जमावातील एकजण जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. हे दृश्‍य बघताना नागरिकांना काहीवेळ काही समजेना. मात्र, जमाव नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी घेतलेले प्रात्यक्षिक असल्याचे समजताच सुटकेचा निःश्वास सोडण्यात आला.

पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते, सहाय्यक पोलिस निरीक्षक जी. एस. तायडे यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड हजर होते.

police mock drill in manmad
गणेशमूर्तींनी बाजारपेठ सजली…

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com