
जुने नाशिक : मकर संक्रातीच्या सणाच्या काही दिवस आगोदर बाजारात पतंग आणि त्यासाठी लागणार मांजा विक्रीसाठी येतो. यात पक्षी आणि नागरिकांसाठी धोकादायक असलेला नायलॉन मांजावर बंदी असताना देखील सर्रास विक्री केली जाते.
सोमवारी दुचाकीवर जात असलेल्या हिरावाडी येथील भारती जाधव या महिलेचा नायलॉन मांजाने गळा चिरुन मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर भद्रकाली पोलिसांनी सोमवारी (ता.२८) रात्री जुने नाशिक परिसरातील पतंग विक्री दुकानांची तपासणी केली. तसेच दुकानदारांना काही सूचना करण्यात आल्या.
मांजाने गळा कापल्याने मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या धक्कादायक घटनेनंतर लगेचच पोलिसांना जाग आली. जुने नाशिकमधील विविध भागातील दुकानाची तपासणी मोहीम राबविली.
सर्रास विक्री
नायलॉन मांजा विक्रीस बंदी आहे. तरीही बाजारात सर्रास विक्री होत आहे. अनेक दुकानदार मांजा न ठेवता त्यांची चोरी-छुपी विक्री करतात. तर काही ऑनकॉल मांजा विक्री करत आहे. या घटनेनंतर विक्रेते सतर्क झाले. त्यांनी दुकानातील नायलॉन मांजा पोलिस येण्यापूर्वीच दुकानातून हलविला. त्यामुळे पोलिसांना रिकाम्या हाती परतावे लागले. पोलिसांनी दुकानांमध्ये जागृती करत नायलॉन मांजी विक्री होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना विक्रेत्यांना केल्या. अन्यथा संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.