...तर आता टपाल विभागानेही रोखले पार्सल..कारण... 

indian post.jpg
indian post.jpg

नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी टपाल विभागाने चीनशी संपर्क तोडला आहे. चीनला जाणारे टपाल आणि पार्सलची बुकिंग त्वरित थांबविण्याच्या सूचना टपाल विभागास वरिष्ठ कार्यालयामार्फत देण्यात आल्या आहेत. तशा आशयाचे पत्र टपाल कार्यालयांना प्राप्त झाले आहे. कोरोनाग्रस्त देशातून येणाऱ्या नागरिक किंवा वस्तूशी संपर्क येणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून टपाल विभागानेही परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत चीनशी टपालच्या माध्यमातून येणारा संपर्क तोडण्याचे निश्‍चित केले आहे.

पार्सल सेवा त्वरित थांबविण्याचे आदेश

पत्र काढून सर्व मुख्य टपाल कार्यालयांना चीनसाठी असणारी स्पीड पोस्टसह सर्व प्रकारची टपाल सेवा, तसेच पार्सल सेवा त्वरित थांबविण्याचे आदेशित केले आहे. 21 फेब्रुवारीस त्याबाबतचे पत्र जीपीओ कार्यालयास प्राप्त झाले आहे. त्यानुसार जीपीओ कार्यालयाने लगेचच टपाल सेवा आणि पार्सल सेवा बुकिंग बंद केली आहे. त्यामुळे चीनमध्ये वास्तव्यास असणाऱ्या देशासह शहरातील नागरिकांना आता केवळ मोबाईल आणि टेलिफोनच्या माध्यमातून संपर्क ठेवता येणार आहे. चीनला जाणारे कुठलेही पार्सल असोत वा टपाल असोत कस्टम विभाग ते पाठविण्यास नकार देत आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com